बुडत्या पाकमधून श्रीमंतांचा पळ; देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:27 AM2023-02-16T06:27:32+5:302023-02-16T06:28:13+5:30
देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती सतत ढासळत चालली आहे. कर्जाच्या पाठिंब्यावर धावणाऱ्या पाकिस्तानच्या वाहनाचा वेग आता थांबणार आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे ज्या देशांशी चांगले संबंध होते, त्यांनीही आता पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाकिस्तानलाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल की काय, अशी भीती आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील श्रीमंतांनी देशातून काढता पाय घेतला आहे.
पाकिस्तानवर कर्ज आणि दायित्वे ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहेत. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. त्याच वेळी, यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून पाकला एकूण साडेतीन अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज मिळाले नाही तर पाकची बोट बुडण्यापासून वाचवणे कठीण होईल.
१७० अब्ज डॉलरची करवाढ करणार
कंगाल झालेल्या पाकिस्तानातील पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने नागरिकांवर तब्बल १७० अब्ज डॉलरची करवाढ लादण्यासाठी मौद्रिक विधेयक (मनी बिल) पाकिस्तानी संसदेत सादर केले. कर्जाचा पुढील हप्ता मिळण्यासाठी महसुलात वाढ करण्याची अट नाणेनिधीने पाक सरकारला घातली आहे.
हे काय चालले...
nपेट्रोल, डिझेलच्या किमतीत २० टक्क्यांहून अधिक वाढ.
nवीजदरात एकाचवेळी ८ रु. वाढ.
nपाकिस्तानातील व्यावसायिकांना दिले जाणारे अनुदान संपुष्टात.
nपाकचा परकीय चलनाचा साठा सुमारे साडेतीन अब्ज डॉलरवर.
nमहागाईचा दर २७ टक्क्यांपुढे.
nडॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन २५ टक्क्यांपर्यंत घसरले.