डेंजर! रोबोटने बॉक्स समजून केला माणसाचा चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:19 AM2023-11-10T06:19:58+5:302023-11-10T06:20:13+5:30

दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादन वितरण केंद्रात ही घटना घडली.

The robot understood the box as a human brain | डेंजर! रोबोटने बॉक्स समजून केला माणसाचा चेंदामेंदा

डेंजर! रोबोटने बॉक्स समजून केला माणसाचा चेंदामेंदा

सेउल : दक्षिण कोरियामध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीचा रोबोटने चेंदामेंदा केला आहे. रोबोटने केलेल्या हल्ल्यात त्या व्यक्तीचा चेहरा आणि छातीचा चेंदामेंदा झाला होता. रोबोटमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि रोबोटने संबंधित व्यक्तीला शिमला मिरचीने भरलेला बॉक्स समजला.

घटनेच्या वेळी हा व्यक्ती रोबोटमध्ये नेमकी काय समस्या आहे हे तपासत होता. दक्षिण ग्योंगसांग प्रांतातील कृषी उत्पादन वितरण केंद्रात ही घटना घडली. रोबोटकडे बॉक्स उचलण्याची जबाबदारी होती. रोबोटने बॉक्स व मानव यातील फरक समजून घेण्यात चूक केली. आदेशाविना त्याने व्यक्तीचा वरचा भाग खालच्या भागापासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला. 

यापूर्वीही घटना

२०१५ मध्ये जर्मन कार उत्पादन कंपनी फोक्सवॅगनच्या रोबोटने एका कर्मचाऱ्याला मेटल प्लेटने दाबून ठार मारले होते. 

Web Title: The robot understood the box as a human brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.