घरात पती-पत्नीने किती काम करायचे सरकार सांगणार! स्पेन सरकार २ कोटी खर्च करून तयार करणार ॲप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:17 AM2023-05-23T08:17:28+5:302023-05-23T08:17:35+5:30
घरातील प्रत्येक सदस्य घरातील कामासाठी किती वेळ देत आहे हे देखील ॲप ट्रेस करेल.
माद्रिद : पती घरातील कामे करत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी स्पेन सरकार एक ॲप आणणार आहे. हे ॲप बायकांना सांगेल की त्यांचे पती घरातील कामात किती वेळ घालवतात. हे ॲप आणण्यामागे घरातील कामे स्त्री-पुरुषांमध्ये विभागणे हा आहे.
घरातील प्रत्येक सदस्य घरातील कामासाठी किती वेळ देत आहे हे देखील ॲप ट्रेस करेल. यासाठी सरकार दोन कोटी रुपये खर्च करत आहे. ॲप लाँच केल्यानंतर, पुरुष आणि महिलांच्या घरगुती कामावर देखरेख करणारा स्पेन हा पहिला देश असेल.
महिलांवर ताण लक्षात येणार
nस्पेन सरकारच्या ॲपमुळे घरामध्ये महिलांवर पडणाऱ्या असंख्य कामाचा मानसिक भार समोर येईल. महिलांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानता दूर करण्यासाठी देशात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी मार्चमध्ये स्पेनने लैंगिक समानता कायदा आणला आहे.
nया अंतर्गत कॉर्पोरेट बोर्डात किमान ४० टक्के महिला असणे आवश्यक आहे. यासोबतच मंत्रिमंडळात महिलांचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात महिलांचा कोटा ४४ टक्के आणि वरच्या सभागृहात ३९ टक्के ठेवण्यात आला आहे.
सर्वेक्षण काय सांगते? : नॅशनल स्टॅटिस्टिक्स इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या महिलांनी सांगितले की, त्या त्यांच्या घरातील बहुतांश कामे करतात. त्याच वेळी, १५% पेक्षा कमी पुरुषांनी सांगितले की ते घरातील अनेक कामे करतात.
घरातील कामांचे वाटप होणार
स्पेनच्या लैंगिक समानता मंत्री अँजेला रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हे ॲप पती-पत्नी यांच्यात घरातील काम शेअर करण्यासाठी मदत करेल. या लोकांमध्ये कामाच्या वाटपात मोठी असमानता आहे.
ॲपची गरज का पडली?
nस्पेनमध्ये अनेक वर्षांपासून घरगुती कामातील स्त्री-पुरुष असमानतेने कायदेशीर वादाचा रंग घेतला आहे. एप्रिल २०१७ मध्ये कँटाब्रिया येथील न्यायालयाने एका पुरुषाला त्याच्या पत्नीला २०.६२ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते.
nया वर्षाच्या सुरुवातीला, वेलेझ-मलागा येथील न्यायालयाने एका व्यावसायिकाला त्याच्या पत्नीला २५ वर्षांच्या बिनपगारी घरगुती कामासाठी १.८३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते.