...तर महासत्तेचे निघणार दिवाळे; सरकारकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 08:49 AM2023-05-03T08:49:23+5:302023-05-03T08:49:55+5:30

अमेरिकेने या तिमाहीत ७२६ अब्ज डॉलर कर्ज घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  हे ४४९ अब्ज डॉलर जास्त आहे. अमेरिकेची वित्तीय तूट खूप जास्त आहे.

The US government has exceeded all spending limits, The government has no money to pay the bills | ...तर महासत्तेचे निघणार दिवाळे; सरकारकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत

...तर महासत्तेचे निघणार दिवाळे; सरकारकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत

googlenewsNext

वॉशिंग्टन - अमेरिकन सरकारने खर्च करण्याची सर्व मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारकडे बिल भरण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी आता पैसे शिल्लक नाहीत. अमेरिकेच्या कोषागार सचिव (ट्रेझरी सेक्रेटरी) जेनेट एल येलन यांनी अध्यक्षांना पत्र लिहून सांगितले की, जर कर्ज घेण्याची मर्यादा १ जूनपर्यंत वाढवली नाही, तर सरकारकडे देश चालवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा संपेल. सरकारकडे रोख काहीच शिल्लक राहणार नाही.

अमेरिकेने या तिमाहीत ७२६ अब्ज डॉलर कर्ज घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  हे ४४९ अब्ज डॉलर जास्त आहे. अमेरिकेची वित्तीय तूट खूप जास्त आहे. याचा अर्थ सरकारचा खर्च त्याच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळेच ते संकटात सापडले आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेचा जीडीपी २१.४४ ट्रिलियन डॉलर होता; परंतु अमेरिकेवरील कर्ज २७ ट्रिलियन डॉलर होते. जर हे कर्ज अमेरिकेच्या एकूण ३२ कोटी लोकसंख्येवर टाकले तर प्रत्येक व्यक्तीवर १७ लाख रुपये कर्ज आहे.

कर्ज का वाढले? 
बेरोजगारी वाढणे, व्याजदरात कपात, यामुळे कर्जाचा बोजा
व्याजदर कपातीमुळे अमेरिकेत महागाई वाढली
सरकारने खर्च थांबवण्याऐवजी कर्ज घेऊन कामे सुरू ठेवली. 
२०१९ मध्ये कॉर्पोरेट कर ३५% वरून २१%पर्यंत कमी केला. 
रशिया विरोधात अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी रुपयांची मदत.
चीनला तोंड देण्यासाठी तैवानवर खूप खर्च करण्यात येत आहे.

Web Title: The US government has exceeded all spending limits, The government has no money to pay the bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.