या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अमेरिकेने केले जप्त, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:18 AM2024-09-04T09:18:56+5:302024-09-04T09:19:29+5:30

US seized the plane of the president of Venezuela: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकाेलस मादुराे यांचे लक्झरी जेट विमान अमेरिकेने जप्त केले आहे. हे विमान फसवणूक करून खरेदी केले हाेते तसेच ते तस्करी करून अमेरिकेबाहेर नेण्यात आले हाेते, असा अमेरिकेचा आराेप आहे. विमान डाॅमिनिक रिपब्लिकमध्ये जप्त करण्यात आले.

The US seized the plane of the president of Venezuela, why? | या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अमेरिकेने केले जप्त, कारण काय?

या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अमेरिकेने केले जप्त, कारण काय?

वाॅशिंग्टन - व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकाेलस मादुराे यांचे लक्झरी जेट विमान अमेरिकेने जप्त केले आहे. हे विमान फसवणूक करून खरेदी केले हाेते तसेच ते तस्करी करून अमेरिकेबाहेर नेण्यात आले हाेते, असा अमेरिकेचा आराेप आहे. विमान डाॅमिनिक रिपब्लिकमध्ये जप्त करण्यात आले.
दसाॅल्ट फाल्कन ९००ईएक्स लग्झरी जेट विमान ११० काेटी रुपयांत खरेदी केले होते. विमान खरेदीसाठी मादुरोंशी संबंधित लाेकांनी कॅरिबियन शेल कंपनीचा वापर करून स्वत:ची ओळख लपविली. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात व्यापार बंदी आहे.

Web Title: The US seized the plane of the president of Venezuela, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.