हुथी बंडखोरांची हिंसा भारताच्या दारात पोहोचली! अरबी समुद्रात जहाजावर केला ड्रोन हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 05:27 PM2023-12-23T17:27:57+5:302023-12-23T17:28:20+5:30

ड्रोन हल्ल्यामुळे भारतात येणाऱ्या जहाजाला आग लागली

The violence of Houthi rebels reached India's doorstep! Drone attack on ship in Arabian sea | हुथी बंडखोरांची हिंसा भारताच्या दारात पोहोचली! अरबी समुद्रात जहाजावर केला ड्रोन हल्ला

हुथी बंडखोरांची हिंसा भारताच्या दारात पोहोचली! अरबी समुद्रात जहाजावर केला ड्रोन हल्ला

भारतीय किनारपट्टीजवळील हिंदी महासागरात लायबेरियाचा ध्वज असलेल्या टँकरवर ड्रोनने हल्ला केला आहे. अरबी समुद्रात झालेल्या या हल्ल्याला अनेक अहवालांमध्ये पुष्टी मिळाली आहे. याआधी ब्रिटनच्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन ऑर्गनायझेशनने या हल्ल्याची माहिती दिली होती. या हल्ल्यात जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबरला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हे व्यापारी जहाज आपल्या गंतव्य भारताकडे प्रवास करत आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. जहाजावर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. येमेनच्या हुथींवर या हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ड्रोन हल्ल्यानंतर भारतात येणाऱ्या जहाजाला आग लागली. यापूर्वी इस्रायलच्या हल्ल्याला विरोध करणाऱ्या येमेनच्या हुथी बंडखोरांनी भारतात येणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले होते. एवढेच नाही तर, हुथींनी लाल समुद्रात अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत, ज्यामुळे अनेक जहाजांचे नुकसान झाले आहे. हुथींना इराणचा उघड पाठिंबा आहे आणि ते हमासच्या समर्थनार्थ सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करत आहेत. त्यामुळे जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गांपैकी एक असलेला सागरी मार्ग आता धोक्यात आला आहे. यामुळेच आता अनेक कंपन्या आफ्रिकेतून व्यवसाय करत आहेत. यासाठी खूप खर्च होत आहे.

यापूर्वी, हुथींच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने एडनच्या आखातात दोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज नाशक तैनात केले होते. या संपूर्ण भागात भारतीय जहाजांचे संरक्षण करण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत. त्याच वेळी, हुथी बंडखोर सतत त्यांचे हल्ले वाढवत आहेत आणि याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने २० देशांसोबत एक सागरी फौज तयार केली आहे, जेणेकरून प्रत्युत्तराची कारवाई करता येईल. तरीही हुथींचे हल्ले काही केल्या कमी होत नाहीयेत.

Web Title: The violence of Houthi rebels reached India's doorstep! Drone attack on ship in Arabian sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.