ज्वालामुखीच्या उद्रेकाने डोंगराला गेला ४ किलोमीटर लांबीचा तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:15 AM2024-08-24T06:15:33+5:302024-08-24T06:20:01+5:30

डिसेंबरनंतर या बेटावर सहावेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 

The volcanic eruption left a 4 km long fissure in the mountain | ज्वालामुखीच्या उद्रेकाने डोंगराला गेला ४ किलोमीटर लांबीचा तडा

ज्वालामुखीच्या उद्रेकाने डोंगराला गेला ४ किलोमीटर लांबीचा तडा

ग्रिंडाविक : नैऋत्य आइसलँडमध्ये रेक्जनेस बेटावर गुरुवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक झाला. लागोपाठ झालेल्या भूकंपानंतर ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने तप्त लाव्हारस बाहेर पडत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तासभरात सुंधनुकुर क्रेटर नामक ज्वालामुखीच्या डोंगराला ४ किलोमीटर लांबीचा तडा गेला आहे.  डिसेंबरनंतर या बेटावर सहावेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. 

रेक्जनेस बेटावर अनेक शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ज्वालामुखीचा स्फोट झाला. स्फोटाचा प्रभाव स्थानिक पातळीवर मर्यादित असला तरी या भागातील  वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, स्थानिकांना ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कोणताही धोका नाही. लाव्हारसचा प्रवाह ग्रिंडाविक शहराच्या दिशेने जात नाही, ही दिलासादायक बाब बसल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. 

- रेक्जनेस बेटावर  ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाल लाव्हा असा मोठ्या प्रमाणात पसरला होता. या ज्वालामुखीमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र यावेळी ज्वालामुखीचा लाव्हा ग्रिंडविक शहराकडे जात नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबरपासून सहाव्यांदा ज्वालामुखीचा 
उद्रेक झाला आहे. 

- २०१० मध्ये येथे सर्वात विध्वंसक एज्जाफ्याल्लाजोकूल ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामुळे राखेचे प्रचंड मोठे ढग आकाशात पसरले होते आणि त्यामुळे अनेक महिन्यांपर्यंत यामुळे हवाई प्रवास बंद विस्कळीत झाला होता.

- यापूर्वी येथे डिसेंबरमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. रेक्जनेस बेटावर ४ ते ५ वर्षांत ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो.

Web Title: The volcanic eruption left a 4 km long fissure in the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.