नवऱ्यासोबत भांडण करून घरातून बाहेर पडली बायको, 30 कोटी रुपये घेऊन घरी परतली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 05:59 PM2022-12-23T17:59:56+5:302022-12-23T18:00:38+5:30
हे कपल अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर एक 49 वर्षांची महिला घरातून बाहेर पडली होती...
बाजारातून काही सामान आणायचे होते. मत्र, नवऱ्याला वेळ नव्हता आणि बायकोही बिझी होती. यामुळे बाजारात जाण्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. अखेर बायकोलाच बाजारात जावे लागले. मात्र, ती घरी परतताना करोडपती होऊनच परतली. ती जेव्हा घरी परतली तेव्हा, तब्बल 30 कोटी रुपयांहून अधिकची मालकिन बनली होती.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, हे कपल अमेरिकेतील मिशिगनमधील आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर एक 49 वर्षांची महिला बाजारात चिकन वगैरे आणण्यासाठी गेली होती. मात्र, अचानक तिने एक लॉटरीचे तिकीटही विकत घेतले. घरी आल्यानंतर जेव्हा तिने ते तिकीट स्क्रॅच केले, तेव्हा ती अवाक झाली. कारण तिने लॉटरीमध्ये तब्बल 30 कोटींहून अधिक रुपये जिंकले होते. एवढी मोठी रक्कम मिळाल्याने पती-पत्नी अत्यंत खुश आहेत. मात्र, त्यानी त्यांची ओळख उघड केलेली नाही.
Michigan VIP Millions लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या महिलेने म्हटले आहे, 'थँक्सगिव्हिंग'च्या आदल्या दिवशी माझ्या पतीने मला विचारले, की तू बाजारात जाऊन नॉनव्हेज फूड आणू शकतेस का? कारण त्याला वेळ नव्हता. पण मीही बिझी होते, यामुळे मी नकार दिला. यामुळे आमच्यात थोडा वाद झाला आणि शेवटी मीच मार्केटमध्ये गेले.
घरातील सामानासोबत लॉटरीचे तिकिटही विकत घेतले -
महिलेने पुढे सांगितले, बाजारात गेल्यानंतर, सामानासोबत एक लॉटरीचे तिकीटही विकत घेतले. यानंतर, काही वेळाने घरी आल्यानंतर ते स्क्रॅच केले, तेव्हा आपण लॉटरी जिंकल्याचे लक्षात आले. एवढा आनंद झाला की, मी बक्षिसाची रक्कमही तपासली नाही. यानंतर मी थेट लॉटरी अॅपवर तिकीट स्कॅन केले आणि लॉटरी लागली आहे, की नाही हे कन्फर्म केले. कन्फर्म झाल्यानंतर, बक्षीसाची रक्कम जाणून मला धक्का बसला. ही रक्कम 30 कोटींहून अधिक होती. यानंतर, बरे झाले माझा नवरा सामान आणायला गेला नाही, नाही तर एवढी मोठी रक्कम मिळाली नसती, असेही महिलेने म्हटले आहे.