जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान हेलिकॉप्टरला लटकवले; F-35 असा व्हिडीओ पाहिला नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 09:06 PM2023-01-29T21:06:10+5:302023-01-29T21:06:27+5:30
अनेक देशांची दुहेरी इंजिन असलेली लढाऊ विमाने करू शकत नाहीत तितकी शक्ती या विमानाचे एकच इंजिन निर्माण करते.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान एफ-35 चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान हेलिकॉप्टरने दोरखंडाने उचलून एका जागेहून दुसऱ्या जागेवर नेण्यात आले. याचा व्हिडीओ हेलिकॉप्टर बनिवणाऱ्या सिकोरस्की कंपनीने शेअर केला आहे.
F-35 जगातील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तिशाली लढाऊ विमान मानले जाते. अनेक देशांची दुहेरी इंजिन असलेली लढाऊ विमाने करू शकत नाहीत तितकी शक्ती या विमानाचे एकच इंजिन निर्माण करते. अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरला टांगून F-35 वाहून नेण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावर कंपनीने याचे कारणही दिले आहे. अमेरिकन एव्हिएशन निर्माता सिकोर्स्कीने म्हटले की, यूएस मरीन काहीही इकडून तिकडे नेऊ शकतात. हे सिद्ध करण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, नेव्हल एअर स्टेशन पॅटक्सेंट नदीवरील मरीनने यूएस नेव्हीचे सेवेतून निवृत्त झालेले F-35C प्रोटोटाइप CH-53K हे लढाऊ विमान ट्रान्स्पोर्ट केले.
The @USMC can move just about anything. To prove it and to practice, Marines at @NASPaxRiverPAO lifted the @USNavy's first retired F-35C prototype with the U.S. military's most powerful helicopter, the CH-53K. #OnlyTheKCanpic.twitter.com/iUWXI78A2H
— Sikorsky (@Sikorsky) January 27, 2023
प्रोटोटाइप चाचणीसाठी तयार केले जातात. त्यानंतर गरजेनुसार विमान बदलले जाते. नंतर अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच विमानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाते. विमान त्यातले एक होते. सिकोर्स्की CH-53K किंग स्टॅलियन (Sikorsky S-95) हे एक हेवी लिफ्ट कार्गो हेलिकॉप्टर आहे. हे अमेरिकन सैन्याचे सर्वात मोठे आणि वजनदार हेलिकॉप्टर आहे. आतापर्यंत हेलिकॉप्टरची 18 युनिट्स तयार करण्यात आली आहेत.