‘...तर ७५% सरकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 06:56 AM2023-09-15T06:56:47+5:302023-09-15T06:57:09+5:30

Vivek Ramaswamy: राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास ७५ टक्क्यांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या अमेरिकन-भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांनी केली.

'...then 75% government employees will be sent home' - Vivek Ramaswamy: | ‘...तर ७५% सरकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार’

‘...तर ७५% सरकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार’

googlenewsNext

वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास ७५ टक्क्यांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या अमेरिकन-भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांनी केली. त्याशिवाय एफबीआयसह अन्य सरकारी संस्थाही बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

रामास्वामी म्हणाले, राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच नोकरकपातीला सुरुवात केली जाईल. वर्षभरात सरकारी नोकरदारांची संख्या ५० टक्क्यांनी कमी केली जाईल. एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचारी पुढील ५ वर्षांमध्ये निवृत्त होतील, तर ४ वर्षांमध्ये एकूण २२ लाख कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल. कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार सरकारी कामकाज करण्यावर आमचा भर असेल, असे रामास्वामी म्हणाले. अमेरिकेत एकूण सरकारी कर्मचारी २२.५० लाख आहेत..

Web Title: '...then 75% government employees will be sent home' - Vivek Ramaswamy:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.