...तर वैमानिक मुख्य संशयित
By Admin | Published: June 23, 2014 05:00 AM2014-06-23T05:00:50+5:302014-06-23T05:00:50+5:30
एमएच ३७० हे मलेशियन विमान बेपत्ता होण्यामागे तांत्रिक बिघाड वा दहशतवादाची शक्यता नाकारता येत नाही.
क्वालालंपूर : एमएच ३७० हे मलेशियन विमान बेपत्ता होण्यामागे तांत्रिक बिघाड वा दहशतवादाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मानवी कृतीतून हे जर घडले असेल तर वैमानिकच त्याचा सूत्रधार असण्याची सर्वाधिक शक्यता आहे, असा निष्कर्ष मलेशियन पोलिसांनी काढला आहे.
मलेशियन पोलिसांनी विमानातील कर्मचारी व प्रवाशांच्या पार्श्वभूमीची तपासणी केल्यानंतर वैमानिकाकडे प्रमुख संशयित म्हणून अंगुलीनिर्देश केल्याचे द संडे टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे. विशेष शाखेने कॅप्टन जहारीन शाह (५३) याच्यावर लक्ष केंद्रित केले. शाहला लहान- सहान कामांसाठी वापरण्यात येणारी साधने (गॅडगेट्स) व सोशल साईटवर पोस्टिंग टाकण्याचा छंद होता. शाह याच्या घरात सापडलेल्या एका फ्लाईट सिम्युलेटरवरून (विमानाची एक प्रकारची प्रतिकृती) त्याच्यावरील संशय बळावला आहे. या सिम्युलेटरमध्ये शाहने दक्षिण हिंदी महासागरातील एका छोट्या बेटावरील अत्यंत आखून धावपट्टीवर विमान उतरविण्याचा सराव केल्याचे आढळून आले आहे. (वृत्तसंस्था)