...तर पाकमधील दहशतवादी गटांवर कारवाई
By admin | Published: October 24, 2016 03:31 AM2016-10-24T03:31:58+5:302016-10-24T03:31:58+5:30
पाकिस्तानातील सगळ््या दहशतवादी गटांवर जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही स्वत:च कारवाई करू, असे स्पष्टपणे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले.
वॉशिंग्टन : पाकिस्तानातील सगळ््या दहशतवादी गटांवर जेव्हा गरज असेल त्यावेळी आम्ही स्वत:च कारवाई करू, असे स्पष्टपणे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले.
पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय पाकिस्तानात राहून दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांविरुद्ध कारवाई करणार नसेल तर आम्ही त्या गटांना उधळून लावण्यास व नष्ट करण्यास मागेपुढे बघणार नाही, असे दहशतवादाला मिळणाऱ्या पैशांच्याविरोधात काम करणाऱ्या विभागाचे अॅक्टिंग अंडर सेक्रेटरी अॅडम झुबिन यांनी म्हटले. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
झुबिन म्हणाले, ‘‘पाकिस्तानात सक्रिय असलेल्या सगळ््या दहशतवादी गटांवर कारवाई करण्याविरोधात पाकिस्तान सरकारमध्येच काही शक्ती (विशेषत: इंटर सर्व्हीस इंटेलिजन्स-आयएसआय) आहेत हाच प्रश्न आहे. पाकिस्तानात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाई करा, असे आम्ही पाकिस्तानला सतत सांगत आलो आहोत. आम्ही त्यांना मदत करायलाही तयार आहोत. सध्या दहशतवादी गटांना मिळणारा पैसा रोखण्यासाठी आणि दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पाकिस्तानसोबत निश्चितच आहोत परंतु गरज भासल्यास दहशतवादी गटांना विस्कळीत व नष्ट करण्यासाठी अमेरिका स्वत:हून कारवाई करायला मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पाकिस्तान दहशतवादविरोधात अनेक अंगांनंी निर्णायक असा भागीदार होता व आहेदेखील, असे ते म्हणाले. पाकिस्तानला अत्यंत क्रूर अशा दहशतवादाचे बळी व्हावे लागले आहे, यात शंका नाही. तेथे शाळा, बाजारपेठा, मशिदींवर हल्ले झाले व ही यादी संपतच नाही, असे ते म्हणाले. उत्तरपश्चिम पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित स्थानांवर सध्या पाकिस्तानने कारवाई करून यश मिळवले आहे. पाकिस्तानने अधिकृतरित्या इस्लामिक स्टेटला दहशतवादी संघटना जाहीर केले आहे. त्याने तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीवरही कारवाई केली आहे. परंतु आयएसआयकडून दहशतवादी गटांना मिळणाऱ्या पाठिंबा कायम आहे. असा फरक असल्यामुळेच आम्ही त्याच्या बाजुने राहू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
भारत-बांगलादेश सीमेवर संशयास्पद सिग्नल्स संपर्क
कोलकाता : भारत-बांगलादेश सीमेवर गेल्या काही महिन्यांत संशयास्पद सिग्नल्स बंगाली आणि उर्दु भाषेत दिले गेल्यामुळे अतिरेकी आता हा आतापर्यंत न रुळलेला मार्ग संपर्कासाठी वापरत आहेत का असा संशय बळावला आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी तातडीने २४ तास हॅम रेडिओ आॅपरेटर्स नियुक्त केले आहेत. बशीरहाट आणि सुंदरबन भागात
हौशी हॅम रेडिओ आॅपरेटरने गेल्या जून महिन्यात संशयास्पद रेडिओ सिग्नल्स आणि अनधिकृत रेडिओ संपर्क सांकेतिक अशा बंगाली आणि उर्दु भाषेत पकडले. या घटनेनंतर सावध झालेल्या आॅपरेटर्सनी केंद्रीय दूरसंचार व माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सिग्नल्स पकडण्यासाठी व त्यांचा माग काढण्यासाठी इंटरनॅशनल मॉनिटोरिंग सेंटरला (रेडिओ) सांगितले. आता २३ हॅम रेडिओ आॅपरेटर्सचा संच हे रेडिओ सिग्नल्स आले कोठून याचा माग काढण्यासाठी २४ तास काम करीत आहेत. जे झाले ते खूपच संशयास्पद आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे आहे कारण जेव्हा केव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी संभाषण थांबवले.