...तर शोधावी लागेल नवी पृथ्वी
By admin | Published: May 5, 2017 01:21 AM2017-05-05T01:21:41+5:302017-05-05T01:21:41+5:30
वाढती लोकसंख्या, हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आदी कारणांमुळे मनुष्याला शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल
न्यूयॉर्क : वाढती लोकसंख्या, हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आदी कारणांमुळे मनुष्याला शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी व्यक्त केले आहे.
७५ वर्षीय स्टिफन हे एका आजारामुळे खुर्चीवरच बसून असतात. संगणकाच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करतात. स्टिफन यांचे म्हणणे आहे की, मनुष्याला जीवित राहायचे असेल, तर आता दुसरी पृथ्वी शोधावी लागेल. परग्रहावर जाऊन वास्तव्य करावे लागेल. तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास आणि मानवी आक्रमकता यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. विज्ञानाच्या अति वापरामुळे माणूस परावलंबी होत आहे. अणू किंवा जैविक युद्धाच्या माध्यमातून मानव जातीचा मोठा ऱ्हास होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मानव प्रजाती जीवित ठेवण्याची योग्यताही मनुष्य हरवून बसेल. एकूणच परिस्थिती अशी आहे की, मनुष्य पृथ्वीवर अधिक काळ राहू शकणार नाही. त्यामुळे त्याला पृथ्वी सोडून अन्य पर्याय शोधावा लागणार आहे, असेही स्टिफन हॉकिंग यांनी म्हटले आहे.