ब्रिटनमध्ये २३ हजार संशयित दहशतवादी मोकाट

By admin | Published: May 29, 2017 01:20 AM2017-05-29T01:20:54+5:302017-05-29T01:20:54+5:30

इंग्लंडमध्ये जवळपास २३ हजार संशयित दहशतवादी फरार असू शकतात, असे ब्रिटनच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे. मँचेस्टर येथे लिबियन

There are 23,000 suspected terrorists in Britain | ब्रिटनमध्ये २३ हजार संशयित दहशतवादी मोकाट

ब्रिटनमध्ये २३ हजार संशयित दहशतवादी मोकाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लंडन : इंग्लंडमध्ये जवळपास २३ हजार संशयित दहशतवादी फरार असू शकतात, असे ब्रिटनच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे. मँचेस्टर येथे लिबियन वंशाच्या सलमान अबेदी (२२) याने घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार, तर ११९ जण जखमी झाले होते. अबेदीवर इंग्लंडच्या गुप्तचर संस्थांची नजर होती. या हल्ल्यानंतर गुप्तचरांनी जवळपास देशभर २३ हजार संशयित अतिरेकी फरार असल्याचे म्हटले आहे. अबेदीबद्दल एमआय १५ या गुप्तचर संस्थेकडे काय माहिती होती हे जाहीर करण्याचे दडपण वाढले आहे.
सरकारी सूत्रांनी ब्रिटनमधील प्रसारमाध्यमांतील एका गटाला, असे सांगितले आहे की, देशात अतिरेकी प्रवृत्तीचे २३ हजार ंलोक आहेत, असा आमचा विश्वास आहे. एकूण अतिरेक्यांपैकी जवळपास तीन हजार लोक धोकादायक असल्याचे मानले जाते. राहिलेले २० हजार लोक पूर्वी झालेल्या चौकशीत समोर आले होते व त्यांचाही समावेश ‘धोका’ अशा गटातच केला गेलेला आहे.
दरम्यान, ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सीसीटीव्ही इमेजेस प्रसिद्ध केल्या असून, त्यानुसार आत्मघाती हल्लेखोर अबेदी हा मँचेस्टर एरेनावर हल्ला करायच्या आधी एरियाना गँ्रड कॉन्सर्टमध्ये शेवटचा दिसला होता. या हल्ल्यासंदर्भात अजून १४ ठिकाणांचा शोध घेतला जात आहे व दहशतवादी गुन्ह्यांच्या संशयावरून ११ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गुंतागुंतीच्या चौकशीमध्ये आम्ही महत्त्वाची प्रगती केली आहे. आम्ही ब्रिटनच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी पोलीस यंत्रणेचे नेटवर्क आणि इंग्लंडच्या गुप्तचरांसोबत काम करीत आहोत. लिबियातून अबेदी इंग्लंडमध्ये १८ मे रोजी आला, तेव्हापासून त्याच्या हालचालींची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
आमचे प्राधान्य या भयानक दहशतवादी घटनेचा प्रवास कसा झाला व यात आणखी किती लोक गुंतलेले आहेत हे समजून घेण्यास आहे, असे पोलिसांनी त्यात म्हटले. अकरा लोकांना अटक झाल्यामुळे ब्रिटनवरील हल्ल्याची पातळी शनिवारी ‘अतिगंभीर’ पातळीवरून ‘गंभीर’ पायरीवर उतरली. याचा अर्थ असा की हल्ले ताबडतोब होणार नसले तरी त्यांची शक्यता मोठी आहे.
 

Web Title: There are 23,000 suspected terrorists in Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.