'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2018 02:24 PM2018-04-08T14:24:09+5:302018-04-08T14:25:37+5:30

फेसबुकच्या सीईओ शेरिल सँडबर्ग यांचे विधान

There could be more data leaks like Cambridge Analytica says Facebook CEO Sheryl Sandberg | 'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' 

'केंब्रिज अॅनॅलिटिकासारखे डेटा चोरीचे आणखी प्रकार समोर येऊ शकतात' 

Next

केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरात टीका सहन करावी लागली होती. मात्र आता फेसबुकच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिकसारखी आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात, असे फेसबुकच्या चीफ ऑपरेशन ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी म्हटले आहे. फेसुबकच्या वरिष्ठ अधिकारी वर्गात सँडबर्ग यांचे स्थान दुसऱ्या क्रमांकाचे आहे. संस्थापक मार्क झुकेरबर्गनंतर सँडबर्ग यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे त्यांचे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 

'केंब्रिज अॅनॅलिटिका डेटा लिक प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र असे आणखीही प्रकार उजेडात येऊ शकतात,' असे सँडबर्ग यांनी एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले. वापरकर्त्यांना त्यांची माहिती वापरली जाऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी त्या माहितीसाठी पैसे मोजावेत, असे म्हणत  सँडबर्ग यांनी 'पेड सेवे'चे संकेत दिले. सँडबर्ग यांच्या मुलाखतीचे टीव्हीवर प्रक्षेपण झाल्यानंतर, पेड सेवा देण्याबद्दल फेसबुकला प्रश्न विचारण्यात आले. मात्र असा कोणताही विचार नसल्याचे फेसबुकने स्पष्ट केले. सँडबर्ग या जर-तरच्या स्थितीत पेड सेवेबद्दल बोलत होत्या, असे स्पष्टीकरण फेसबुकने दिले. 

'फेसबुककडून वापरकर्त्यांच्या माहितीची काळजी घेतली जाते. वापरकर्त्यांची माहिती गोपनीयता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र केंब्रिज अॅनॅलिटिका प्रकरणात आम्ही माहितीची गोपनीयता राखण्यात कमी पडलो,' असे सँडबर्ग यांनी मुलाखतीत सांगितले. केंब्रिज अॅनॅलिटिकामध्ये काम केलेल्या एका व्यक्तीने फेसबुकवरुन 5 कोटी वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेल्याची बाब गेल्या महिन्यात उघडकीस आणली होती. वापरकर्त्यांची माहिती लिक होत असल्याचे पहिल्यांदा 2015 मध्ये समोर आले असताना फेसबुकला याबद्दल पावले उचलण्यासाठी वेळ  का लागला, असा प्रश्नही सँडबर्ग यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'त्यांनी आम्हाला माहिती डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते,' असे उत्तर सँडबर्ग यांनी दिले. 
 

Web Title: There could be more data leaks like Cambridge Analytica says Facebook CEO Sheryl Sandberg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.