शिकण्याचे वय नसते

By admin | Published: March 22, 2017 12:51 AM2017-03-22T00:51:15+5:302017-03-22T00:51:15+5:30

जपानमधील या ८१ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने. ६० व्या वर्षी संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या या महिलेने अलीकडेच एका आयफोन अ‍ॅपची

There is no age for learning | शिकण्याचे वय नसते

शिकण्याचे वय नसते

Next

टोकियो : जपानमधील या ८१ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने. ६० व्या वर्षी संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या या महिलेने अलीकडेच एका आयफोन अ‍ॅपची निर्मिती केली आहे. जपानमधील एका बँकेत ४३ वर्षे नोकरी करून मसाको वाकामिया निवृत्त झाल्या. मात्र, इतर सामान्य निवृत्तांप्रमाणे घरी न बसता, त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी संगणकाचे शिक्षण घेतले. त्या म्हणतात, या निर्णयाने माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले. इंटरनेटच्या जादुई जगाचा भाग बनलेल्या मसाको यांना हे नवे विश्व खूपच भावले. त्यांनी अलीकडेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अ‍ॅप विकसित करून खूप वाहवा मिळविली. ‘स्मार्ट फोनचे बहुतांश अ‍ॅप युवावर्ग डोळ्यासमोर ठेवून तयार केले जातात. ज्येष्ठांसाठीच्या अ‍ॅपची संख्या खूपच कमी आहे, असे मला आढळून आले,’ असेही त्यांनी अलीकडेच बोलून दाखवले आहे.

Web Title: There is no age for learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.