युरोपीय देशांमध्ये एकमत नाही

By admin | Published: September 16, 2015 12:55 AM2015-09-16T00:55:59+5:302015-09-16T00:55:59+5:30

सीरियन स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे घेतलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

There is no consensus among European countries | युरोपीय देशांमध्ये एकमत नाही

युरोपीय देशांमध्ये एकमत नाही

Next

ब्रुसेल्स : सीरियन स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे घेतलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मात्र युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाऊड जंकर यांनी सुचविलेल्या प्रस्तावावर एकमत झाले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत युरोपातील अनेक देशांच्या विविध नेत्यांच्या भेटी घेऊनही जंकर यांना त्यावर एकमत मिळविण्यात यश आले नाही.
मागील आठवड्यात जीन क्लाऊड जंकर यांनी १ लाख २० हजार स्थलांतरितांना विविध देशांमध्ये स्वीकारण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये त्या देशाची लोकसंख्या, तेथील बेकारीचा दर आणि सकल घरेलू उत्पादन यांचा विचार करून किती स्थलांतरितांना स्वीकारायचे, हे ठरणार होते.
मात्र बळजबरीने स्थलांतरितांना स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका अनेक देशांनी घेतली आणि त्याचेच प्रतिबिंब काल सोमवारी बु्रसेल्स बैठकीमध्ये दिसून आले. गेल्या दोन दिवसांमध्ये स्थलांतरितांच्या प्रश्नावर युरोपातील देश पुन्हा नकारात्मक भूमिकेत गेल्याचे दिसून येत आहे.
म्युनिचवर येणारा लोंढ्याच्या ताणाचा विचार करून जर्मनीने आॅस्ट्रियाच्या बाजूच्या सीमेवर बंधने लादण्याचा निर्णय घेतला. तर आॅस्ट्रियानेहीदेखील हीच भूमिका घेतली आहे. नेदरलँडस, स्लोव्हाकिया आणि पोलंडने स्थलांतरितांना स्वीकारण्याची सक्ती मान्य करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

रशियाची मदत
सीरियातील युद्ध शमविण्याऐवजी रशियाने आपली तोफांची, दारूगोळ्यांची मदत सुरूच ठेवली आहे, सीरियातील लॅटकिया येथे रशियाने आपली मदत पुन्हा पाठविल्याची माहिती प्रकाशात येत आहे. रशियाच्या या भूमिकेवर अमेरिकेने जाहीर चिंता व्यक्त केली; मात्र रशिया सीरियाच्या मागे आतापर्यंतच
तरी उभा राहिल्याचे दिसून येते.

कॅमेरून
लेबनॉनमध्ये
जॉर्डन आणि लेबनॉनमध्ये गेलेल्या सीरियन स्थलांतरितांच्या शिबिरांची माहिती घेण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बैरुत आणि अम्मानचा दौरा केला. सीरियन मुलांच्या शिक्षणाची व शिबिराची माहिती घेऊन ब्रिटनने जाहीर केलेल्या १३७ दशलक्ष युरोच्या वापराबद्दल सूचना दिल्या.

बोट बुडून २२ मृत्युमुखी। तुर्कस्थानातून ग्रीसमध्ये एजियन समुद्रमार्गे जाणाऱ्या बोटीला अपघात होऊन त्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. कॉस बेटाकडे जाणारी ही बोट
६६ फूट इतकी मोठी होती़ त्यातील २०० जणांना वाचविण्यात यश आले आहे; तर ग्रीसच्या फार्माकोन्सी येथे जाणाऱ्या बोटीस रविवारी अपघात होऊन ३४ लोकांचे प्राण गेले आहेत.

हंगेरीमध्ये आणीबाणी
सीरियन एक्झोडसच्या प्रवासात सर्वांत मोठा चिंतेचा टप्पा आला आहे तो हंगेरीमध्ये़ या वर्षभरामध्ये या लहानशा देशात स्थलांतरितांच्या येण्यामुळे अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांमध्ये सर्बिया-
हंगेरी सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर हंगेरीने
अंतर्गत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय
घेतला आहे.
स्थलांतरितांना रोखण्यासाठी हंगेरीने आपल्या सीमांवर कुंपण घालण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर कारावासाची शिक्षा ठोठावणारे नियमही केले; मात्र लोंढ्यांमुळे हा प्रश्न वाढतच गेला.
आता आणीबाणी लागू केल्यानंतर सर्बिया सीमेवरील तारांचे कुंपण ओलांडणाऱ्यांना पकडण्याचा अधिकार हंगेरीयन पोलिसांना मिळाला आहे.

Web Title: There is no consensus among European countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.