सौदीत अल्पवयीनांना देहदंड नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:08 AM2020-04-28T04:08:02+5:302020-04-28T04:08:22+5:30

दोषीला जाहीरपणे फटके मारण्याची सौदी अरेबियातील वादग्रस्त पद्धत आता बंद होईल.

There is no death penalty for minors in Saudi Arabia | सौदीत अल्पवयीनांना देहदंड नाही

सौदीत अल्पवयीनांना देहदंड नाही

Next

दुबई : अल्पवयीनांकडून झालेल्या गुन्ह्यांबद्दल सौदी अरेबियात देहदंडाची शिक्षा दिली जाणार नाही. सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी मृत्युदंड रद्द करण्याचा आदेश दिला, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने निवेदनात म्हटले. याच बरोबर सलमान यांनी चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेऐवजी तुरुंगवास, दंड किंवा समाजसेवा अशी शिक्षा देण्याचे आदेश न्यायाधीशांना दिले. दोषीला जाहीरपणे फटके मारण्याची सौदी अरेबियातील वादग्रस्त पद्धत आता बंद होईल.
या बदलांमागे आणि वहाबीझम या नावाने परिचित असलेल्या अति कर्मठ इस्लामिक कायद्याला सौम्य करण्यामागे किंग सलमान यांचे चिरंजीव व त्यांचे वारस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दिसतात. असे असले तरीही देशात अनेक जण कर्मठ इस्लामी कायदे पाळतात.
>देशाला आधुनिक बनवायचे आहे
क्राऊन प्रिन्स यांना देशाला आधुनिक बनवायचे आहे, विदेशी गुंतवणूक आकर्षित करून घ्यायची आहे आणि जगभर सौदी अरेबियाच्या प्रतिष्ठेला सुधारायचे आहे. राजे सलमान यांच्या या ताज्या आदेशामुळे देशातील शित्ते या अल्पसंख्य समाजातील किमान सहा जणांची मृत्युदंडाची शिक्षा टळणार आहे. या सहा जणांनी ते १८ वर्षांच्या खाली असताना गुन्हे केले होते. यात अली अल-निमर याचाही समावेश असून तो सरकारविरोधातील निदर्शनांत सहभागी झाला होता.

Web Title: There is no death penalty for minors in Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.