पाकने अतिरेकी अड्डे हटविल्याचा पुरावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:59 AM2019-04-14T04:59:50+5:302019-04-14T05:00:02+5:30

इम्रान खान यांनी अलीकडेच जारी केले असले तरी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याचा कोणताही पुरावा प्रत्यक्षात दिसून येत नाही

 There is no evidence that the Pakistan Extremist has been deported | पाकने अतिरेकी अड्डे हटविल्याचा पुरावा नाही

पाकने अतिरेकी अड्डे हटविल्याचा पुरावा नाही

Next

वॉशिंग्टन : दहशतवादी गटांना समर्थन न देण्याचे निवेदन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच जारी केले असले तरी पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याचा कोणताही पुरावा प्रत्यक्षात दिसून येत नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी केले आहे.
जागतिक पातळीवरील तीव्र दबावामुळे इम्रान खान यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते की, ‘पाकिस्तानी भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू दिला जाणार नाही, तसेच देशाच्या भूमीतून कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांविरुद्ध कारवाई केली जाईल.’
एका परिसंवादात हक्कानी यांनी सांगितले की, अतिरेकी संघटना जैश-ए-मोहंमद आणि तिचा प्रमुख मसूद अजहर या दोघांबाबतीत कोणतीही कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. पाकिस्तानसोबतच्या निकटच्या संबंधामुळे चीनने मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्याची संयुक्त राष्ट्रांची कारवाई रोखली. अनेक पुस्तकांचे लेखक असलेले हक्कानी हे सध्या हडसन इन्स्टिट्यूटमध्ये दक्षिण आणि मध्य आशियाचे संचालक आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या देश- विदेशातील धोरणाचे दहशतवादाच्या समर्थनाचे ते कडवे विरोधक आहेत. (वृत्तसंस्था)
>भूमिकेत बदल नाही
यासंदर्भात हक्कानी यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, खान यांचे सरकार अथवा पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करीत असल्याचा कोणताही पुरावा नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्याविरोधात कारवाया करणाºया दहशतवादी गटांबाबत पाकिस्तानच्या भूमिकेत फारसा बदल झालेला नाही.

Web Title:  There is no evidence that the Pakistan Extremist has been deported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.