बुद्ध आणि गांधीच्या भूमीत असहिष्णुतेला थारा नाही - नरेंद्र मोदी
By admin | Published: November 12, 2015 09:17 PM2015-11-12T21:17:56+5:302015-11-12T21:17:56+5:30
भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे, येथे असहिष्णुतेला थारा नाही प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १२ - भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे, येथे असहिष्णुतेला थारा नाही प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत भारतातील असहिष्णुतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटन मध्ये व्याक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) पासून तिन दिवसाच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये किंग्ज चार्ल्स स्ट्रीट येथील ट्रेझरी क्वार्डेंगलवर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' सन्मानित केले. 'गार्ड ऑफ ऑनर' मिळालेले ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान आज चार वाजताच्या सुमारास लंडनमध्ये पोहोचले आहेत. मोदींचे स्वागत करण्यासाठी जेम्स कोर्टवर येथे त्यांचे मोठे समर्थक जमले होते. यावेळी 'मोदी मोदी' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देण्यात आल्या. मोदींनी येथील नागरिकांकाडून शुभेच्छा स्विकारल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये दोन्ही देशाचे संबंध सुधारण्यावर भर दिला जाईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देशातील संबंध एकमेकांसाठी तसेच जगासाठी आणि मानवतेसाठी फायदेशीर आणि उपयोगी ठरतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
> संयुक्त पत्रकार परिषदतेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत -
- भारत-ब्रिटनचे संबंध अधिक मजबूत होतील, नद्यांच्या स्वच्छतेसाठी मदत करण्यावर चर्चा - सायबर सुरक्षेसंदर्भात ब्रिटनसोबत काम करणार
- दोन्ही देशातील संबंध एकमेकांसाठी तसेच जगासाठी आणि मानवतेसाठी फायदेशीर आणि उपयोगी ठरतील
- भारत बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे. प्रत्येक नागरिकांच्या विचारांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे
- भारताचा ब्रिटनसोबत नागरी अणूकरार
- देशाच्या कानकोपऱ्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत सरकार गंभीर
- दहशतवाद हा राष्ट्रव्यापी मुद्दा आहे, भारत-ब्रिटन दोन्ही देशांना दहशतवादाचा त्रास
>> मोदी नॉट वेलकम...
बिहार निवडणुकीतील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्रिटन दौऱ्याच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झाले आहे. मोदींच्या विरोधात आवाज संघटनेच्या वतीने इंग्लंडच्या संसदेबाहेर पोस्टरही लावण्यात आले आहेत. 'मोदी नॉट वेलकम' नावाच्या या कँपेनचे नेतृत्त्व 'आवाज नेटवर्क' करत आहे.