सागरी जिवांना असाही धोका
By admin | Published: September 6, 2015 10:25 PM2015-09-06T22:25:13+5:302015-09-06T22:25:13+5:30
सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्यांनो सावधान. दररोज वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) सागरी जिवांना धोकादायक ठरू शकतील अशा प्लास्टिकच्या कणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला असतो
लंडन : सौंदर्य प्रसाधने वापरणाऱ्यांनो सावधान. दररोज वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) सागरी जिवांना धोकादायक ठरू शकतील अशा प्लास्टिकच्या कणांचा मोठ्या प्रमाणावर वापर झालेला असतो. प्लायमाऊथ युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष आला आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या इंग्लंडमध्ये दरवर्षी समुद्रात अनावश्यक अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण, बिंदू समुद्रात सोडले जातात. इंग्लंडच्या बाजारात चेहरा साफ करण्यासाठी वापरली जाणारी ८० प्रकारची फेशियल्स आहेत व त्यासाठी अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण व बिंदू वापरलेले असतात. साहजिकच त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रदूषण निर्माण होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीत प्लास्टिकचे कण किंवा बिंदूंचा वापर टाळण्यासाठी नैसर्गिक घटक वापरण्यावर भर दिला जात आहे. या उत्पादनांत हँडवॉश, साबण, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम्स, शेव्हिंग फोमस्, बबल बाथ, सनस्क्रीन, शाम्पूचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)