चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:42 AM2020-05-02T04:42:12+5:302020-05-02T04:42:21+5:30

१३.५ किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची २० लाख पौंड (१८.९६ कोटी रुपये ) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

There will be an auction of meteors falling from the moon | चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव

चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव

Next

लंडन : ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. १३.५ किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची २० लाख पौंड (१८.९६ कोटी रुपये ) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.
पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले. एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला असावा, असे मानले जाते.
अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: There will be an auction of meteors falling from the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.