हे दररोज जातात विमानाने आॅफिसला

By admin | Published: July 16, 2017 01:41 AM2017-07-16T01:41:55+5:302017-07-16T01:41:55+5:30

तुम्ही आॅफिसला कसे जाता? या प्रश्नाचे उत्तरही तितकेच साधे आणि सरळ असू शकते. दुचाकी, बस, लोकल रेल्वे, खासगी वाहने, कंपनीची वाहने किंवा स्वत:च्या कारने

These are daily flights to Hawaii | हे दररोज जातात विमानाने आॅफिसला

हे दररोज जातात विमानाने आॅफिसला

Next

तुम्ही आॅफिसला कसे जाता? या प्रश्नाचे उत्तरही तितकेच साधे आणि सरळ असू शकते. दुचाकी, बस, लोकल रेल्वे, खासगी वाहने, कंपनीची वाहने किंवा स्वत:च्या कारने यापेक्षा वेगळे उत्तर असूच शकत नाही. पण, अमेरिकेतील ही व्यक्ती आॅफिसला दररोज जाते कशी? हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. लॉस एंजिलिसमध्ये राहणारे कर्ट वोन बडिन्स्की हे मेकेनिकल इंजिनिअर असून एका कंपनीचे को फाउंडरही आहेत. त्यांचे आॅफिस सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे. ते आॅफिसमध्ये दररोज विमानाने जातात. आफिसला जाण्यासाठी त्यांना दररोज सहा तास लागतात. विमानाच्या भाड्यापोटी महिन्याला दीड लाख रुपये खर्च होतात. आठवड्यातून पाच दिवस आॅफिस असते. विमानात त्यांची दररोज तपासणी होत नाही. विमानातही ते काम करतात. लॉस एंजिलिस ते सॅन फ्रान्सिस्को असा प्रवास आपण रोज करतो असे सांगितल्यावर अनेकांना आश्चर्य वाटते. पहाटे ५.३० वाजता त्यांचा दिवस सुुरु होतो आणि रात्री ९ वाजता ते आॅफिसहून घरी परततात.

Web Title: These are daily flights to Hawaii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.