'हे' आहेत इस्रायलचे 33 ओलीस ठेवलेले नागरिक, ज्यांची शांती करारापूर्वी होणार सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:52 IST2025-01-18T09:52:12+5:302025-01-18T09:52:54+5:30
Israel Hamas War ceasefire deal: इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम करार झाला आहे. त्यामुळे १५ महिन्यांनी युद्ध थांबत असून, पहिल्या टप्प्यात इस्रायलयच्या ३३ नागरिकांची सुटका केली जाणार आहे.

'हे' आहेत इस्रायलचे 33 ओलीस ठेवलेले नागरिक, ज्यांची शांती करारापूर्वी होणार सुटका
Israel hamas ceasefire deal: अखेर गाझापट्टीतील संघर्ष थांबणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्या युद्ध थांबवण्यासंदर्भात करार झाला आहे. या करारानुसार पहिल्या टप्प्यात हमास ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या ३३ नागरिकांची सुटका करणार आहे. यात एका दोन वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इस्रायल सरकारने हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेबद्दल एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरवर त्या सगळ्या लोकांचे फोटो आहेत, जे हमासच्या ताब्यात आहेत. या ३३ ओलीस नागरिकांची हमास सुटका करणार आहे.
ज्या ३३ नागरिकांची हमासच्या तावडीतून सुटका होणार आहे, त्यांच्या कुटुंबीयांनाही इस्रायल सरकारने कळवले आहे. या नागरिकांना ४२ दिवसांच्या काळात सोडले जाणार आहे. यात महिला, लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे.
ओलिसांपैकी किती नागरिक जिवंत?
अशी माहिती समोर आली आहे की, इस्रायल सरकारने ज्या ३३ नागरिकांच्या सुटकेबद्दलचे पोस्टर प्रसिद्ध केल आहे, त्यातील किती नागरिक जिवंत आहेत, याबद्दल हमासने कोणतीही माहिती दिलेली नाही. दुसरीकडे इस्रायल सरकारने आशा व्यक्त केली आहे की, यातील बहुतांश लोक सुरक्षित असतील.
युद्धविराम झाल्यानंतर सात दिवसांनी या सगळ्या लोकांच्या स्थितीबद्दल पूर्ण रिपोर्ट दिला जाणार आहे.