सीरियावर अमेरिकेने कशाप्रकारे केला हल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 04:23 PM2018-04-14T16:23:04+5:302018-04-14T16:23:04+5:30
आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला.
(Image Credit: CNN)
न्यूयॉर्क - सीरियावर केमिकल हल्ला केल्यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सीरियातील सरकार विरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यात तिन्ही देशांना काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. सीएनएनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात B-1 बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्सचा वापर करण्यात आला.
टॉरनॅडो जेट्सने सोडले मिसाइल
ब्रिटेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चार टॉरनॅडो जेट्सने मिसाइलचा हल्ला करण्यात आला. त्यासोबतच फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने रफाल फाइटर प्लेन्सने मिसाइल सोडल्याचा व्हिडीओ जारी केलाय. 400 किलोग्रॅम वजन क्षमता असणारे टॉरनॅडो जेट्स हे 400 किमीपर्यंत निशाणा साधू शकतात.
B-1 बॉम्बर्स ने हल्ला
अमेरिका मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत बी-1 बॉम्बर्सचा वापर करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पण मंत्रालयाने याबाबत काही माहिती दिली नाही.
अमेरिकेच्या मिसाइल क्रूझचा वापर
अमेरिकेच्या वायूदलाने स्पष्ट केले आहे की, सीरियामध्ये हवाई हल्ल्यासाठी वायूदलाच्या मिसाइल क्रूझचा वापर केला आहे. आरलीग ब्रूक क्लास आणि टिकोनडर्गो क्लास क्रूझर्ससोबतच अनेक टॉमहॉक क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात आला.
फ्रान्सचे राफेल जेट्स
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर राफेल जेट्सचा सीरियातील हल्ल्यात वापर केल्याचं सांगितलं आहे. राफेल जेट्सची खासियत म्हणजे हे हवेत दूरपर्यंत मारा करु शकतात.
टॉमहॉक क्रूझ मिसाइल
टॉमहॉक क्रूझ मिसाइलचा वापर गेल्यावर्षी सीरियावरील हल्ल्यात अमेरिकेकडून करण्यात आला होता. या मिसाइलची खासियत म्हणजे यांचं टार्गेट युद्धादरम्यान बदललं जाऊ शकतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हवाई हल्ल्यांच्या आदेशानंतर सीरियातील दमिश्कजवळ स्फोटाचा आवाजही ऐकू आला. दुसरीकडे, रशियानेही अमेरिकेला मिसाइल हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे.
'सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून हल्ले सुरु करावेत, असे आदेश काहीच वेळापूर्वी आम्ही सैन्याला दिले आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना म्हणाले.
'फ्रान्स आणि ब्रिटनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, सीरियातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता.