अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:44 PM2021-08-22T17:44:28+5:302021-08-22T17:44:35+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून पळून गेलेले बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत आहेत.

These countries have given asylum to Afghan nationals, including India | अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

अफगाणी नागरिकांना 'या' देशांनी दिला आश्रय, यादीत भारताचंही नाव

googlenewsNext

नवी दिल्ली:अफगाणिस्तानवरतालिबानचा कब्जा झाल्यानंतर अनेक अफगाणी नागरिक देश सोडून जात आहेत. तालिबानच्या राटवटीत राहायचे नाही म्हणून लोक जीवाची परवा न करता देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भातील काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात, अनेक देशांनी संकटग्रस्त अफगाणींना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. 

अफगाणिस्तानातून पळून जाणारे बहुतेक अफगाणी पाकिस्तान आणि इराणमध्ये आश्रय घेत असल्याचं वृत्त आहे. आकडेवारीनुसार 26 लाख अफगाण निर्वासितांपैकी 90 टक्के निर्वासीत या दोन देशांमध्ये आहेत. गेल्या मे महिन्यापासून सातत्यानं लोकांची पलायन होत आहे. रविवारी तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यानंतर पलायन वाढलं.

हे देश देत आहेत आश्रय
अमेरिकाआतापर्यंत 1200 अफगाण लोकांना बाहेर काढून अमेरिकेत आणण्यात आलं आहे. 'ऑपरेशन अलायन्स रेफ्युजी' अंतर्गत येत्या आठवड्यात ही संख्या 3500 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिका 10 हजार अफगाण नागरिक घेऊ शकते अशी बातमी आहे. यामध्ये अमेरिकन सरकारला मदत करणाऱ्यांचा समावेश आहे.

कॅनडा-गेल्या आठवड्यात कॅनडानं 20,000 अफगाण निर्वासितांना आपल्या देशात आणण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटन-नवीन पुनर्वसन कार्यक्रम पहिल्या वर्षी पाच हजार अफगाणांचे स्वागत करण्यासाठी तयार आहे. ब्रिटननं मंगळवारी याची घोषणा केली. या कार्यक्रमात महिला, मुली आणि इतर अल्पसंख्याकांना प्राधान्य दिले जाईल.

भारत-गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानमधील बिघडलेल्या परिस्थितीमध्ये, भारतानं ई-व्हिसाच्या नवीन श्रेणीचा समावेश केला होता. त्या अंतर्गत अफगाण नागरिकांच्या अर्जांवर त्वरीत प्रक्रिया केली जाणार होती. सध्या, हे व्हिसा 6 महिन्यांसाठी वैध आहेत.
 

Web Title: These countries have given asylum to Afghan nationals, including India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.