ते दररोज साजरा करतात ख्रिसमस !
By admin | Published: January 4, 2017 09:08 AM2017-01-04T09:08:28+5:302017-01-04T09:08:28+5:30
इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती आहे जी २३ वर्षं दररोज ख्रिसमस साजरा करत आहे. आनंदाच्या या उत्सवात न्हाऊन निघणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अॅन्डी पार्क
विल्टशायर (इंग्लंड) : ख्रिसमस म्हटलं की, अनेकांच्या उत्साहाला उधाण येतं. अगदी बच्चे कंपनीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वज जण या आनंदात सहभागी होतात. पण, इंग्लंडमध्ये अशीही एक व्यक्ती आहे जी २३ वर्षं दररोज ख्रिसमस साजरा करत आहे. आनंदाच्या या उत्सवात न्हाऊन निघणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे अॅन्डी पार्क. ५३ वर्षीय अॅन्डी यांचा उत्साह आजही तसाच आहे.
विल्टशायरच्या मिल्कशाममध्ये वास्तव्यास असणारे अॅन्डी याबाबत सांगतात की, वर्षातील ३६५ दिवस मी ख्रिसमस साजरा करतो. असं म्हणतात की, हौसेला मोल नसते. अॅन्डी यांच्या बाबतीत ही म्हण अगदी खरी ठरते. कारण, आपल्या हौसेपोटी ते वर्षाला २ मिलियन पौंड खर्च करतात. माझी मुलगी कॅरी एन हिने सांगितल्यानंतर मी काही दिवस ही हौस बंद केली. पण, पुन्हा नव्याने आपण ख्रिसमस साजरा करणं सुरू केल्याचं त्यांनी सांगितले. अॅन्डी हे स्वत: साठी, मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी दररोज भेटवस्तू खरेदी करतात. दर २४ तासाला आपल्याच घराच्या पत्त्यावर एक कार्ड पाठवितात. त्यांच्या घरचं ख्रिसमसचं झाड सदासर्वकाळ बहरलेलं असतं. त्यांनी १९९३ पासून त्रोज ख्रिसमस साजरा करणं सुरू केलं. जवळपास २३ वर्षांच्या काळात त्यांनी भेटवस्तू, अन्नपदार्थ, सजावट आदींसाठी लाखो र्पौड खर्च केले आहेत. आपण अद्याप एकटेच आहोत. पण, श्रीमती इथेच कुठेतरी बाहेर आहेत, असं ते सांगतात. जगण्याचा उत्सव करणाऱ्या अॅन्डी यांना सलाम.