मृत्यूचाही ते उत्सव करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:18 AM2017-11-20T04:18:55+5:302017-11-20T04:19:03+5:30
मृत्यू आणि त्यानंतर नातेवाईकांना होणारा शोकही अटळ आहे. पण, इंडोनेशियातील ही अशी एक जमात आहे जी मृत्यूचाही सोहळा करते. वाचून कदाचित आश्चर्य वाटेल.
मृत्यू आणि त्यानंतर नातेवाईकांना होणारा शोकही अटळ आहे. पण, इंडोनेशियातील ही अशी एक जमात आहे जी मृत्यूचाही सोहळा करते. वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण, टोराजा समुदायात हे वर्षानुवर्ष होत आलेले आहे. या समुदायातील लोक आपल्या नातेवाईकांवर एवढे प्रेम करतात की, मृत्यूनंतरही ते त्यांना आपल्यापासून वेगळे करीत नाहीत. मृत्यूनंतर ते आनंदोत्सव साजरा करतात. या मृतदेहांना कपडे परिधान केले जातात. त्यांच्यासोबत फोटो घेतात. इंडोनेशियाच्या साऊथ सुलावेसी क्षेत्रातील प्रथा विचित्र आहे. येथे असे मानतात की, मनुष्याचा कधी मृत्यू होत नाही. एका विशिष्ट केमिकलने ते मृतदेह जतन करून ठेवतात. भलेही कुणाला ही परंपरा भीतीदायक वाटेल. पण, टोराजा समुदायासाठी तो जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे.