स्वीडनची राजरत्ने चोरुन, स्पीडबोटीने चोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:31 PM2018-08-02T12:31:59+5:302018-08-02T12:32:57+5:30
लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली
स्टॉकहोम- जगभरातील बहुतांश राजघराणी आता केवळ समारंभासाठी आणि केवळ दिखाऊ कार्यक्रमांपुरते उरले असले तरी त्यांच्याबाबत आजही लोकांमध्ये चर्चा होत असते. राजघराण्यांमधील विवाह, तंटे याबाबत आजही लोकांना उत्सुकता असते. स्वीडिश राजघराणेही युरोपिय नागरिकांचे लक्ष वेधून घेत असते. त्यातच आता राजचिन्हांच्या चोरीने भर घातली आहे.
स्वीडिश राजघराण्याची राजचिन्हे व राजरत्ने चोरीला गेली आहेत. मंगळवारी दुपारी दोन चोरांनी स्टॉकहोममधील एका कॅथिड्रलमध्ये मांडलेल्या राजचिन्हांची चोरी केली. लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र या चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली. हा तलावाचा प्रदेश 74 मैलांचा असून त्यामध्ये अनेक बेटे आहेत. तरिही चोरांनी धाडस करून थेट राजघराण्याच्या वस्तूंवर आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
Thieves carrying out a daring robbery in broad daylight walked into a medieval cathedral in Sweden, smashed open a glass security case and stole priceless gold and jewel-encrusted crowns dating to the early 1600s before hopping onto bicycles https://t.co/vwKdNI6f3p
— The Detroit News (@detroitnews) August 2, 2018
चोरांनी राजरत्नांना हात लावताच धोक्याची सूतना देणारी घंटा वाचू लागली मात्र तरिही ती पळविण्यात चोरांना यश आले. या राजचिन्हांचा विमा उतरवला गेला असला तरी त्यांच्या ऐतिहासिक व भावनिक मूल्याची भरपाई करणे अशक्य आहे त्यामुळेच स्वीडिश अधिकारी त्याबाबत चिंतेत आहेत. कॅथिड्रलचा प्रवक्ता याबाबत माध्यमांशी बोलताना म्हणाला, त्या राजचिन्हांचे आर्थिक मूल्य करणे शक्य नाही कारण त्या राष्ट्रहिताच्या दृष्टीने अमूल्य वस्तू होत्या.
राजचिन्हांची चोरी करुन दोन चोरांनी वेगाने दुचाक्या चालवत स्पीडबोटीपर्यंत जाऊन स्पीडबोटीत उड्याच मारल्या व ते तात्काळ निघून गेले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.हा सर्व प्रकार पाहताना प्रत्यक्षदर्शी अक्षरशः थिजून गेले होते. त्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने तपास सुरु करण्यात आला मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.