गाझा ताब्यात घेण्याचा होता विचार

By admin | Published: August 29, 2014 02:35 AM2014-08-29T02:35:25+5:302014-08-29T02:35:25+5:30

पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यात इजिप्त जर अपयशी ठरला असता आणि हमासने रॉकेट हल्ले थांबविले नसते, तर गाझापट्टी पुन्हा पूर्णपणे सैन्याच्या ताब्यात घ्यायचा इस्रायलने गांभीर्याने विचार केला होता.

Think Gaza was to be held | गाझा ताब्यात घेण्याचा होता विचार

गाझा ताब्यात घेण्याचा होता विचार

Next

जेरूसलेम : पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यात इजिप्त जर अपयशी ठरला असता आणि हमासने रॉकेट हल्ले थांबविले नसते, तर गाझापट्टी पुन्हा पूर्णपणे सैन्याच्या ताब्यात घ्यायचा इस्रायलने गांभीर्याने विचार केला होता.
युद्धबंदीची घोषणा व्हायच्या आधी थोडा वेळ इस्रायलच्या लष्करी कमांडरने अंतर्गत सुरक्षा व्यवहाराच्या कॅबिनेटला पुढील कार्यवाहीबद्दल सूचना केल्या होत्या. इस्रायलच्या गुप्तचर खात्याचे मंत्री युवाल स्टेनित्ज यांनी बीबीसीच्या ‘हार्ड टॉक’ कार्यक्रमात बोलताना गाझा पूर्णपणे सैन्याच्या ताब्यात घ्यायचा गांभीर्याने विचार झाला होता, असे सांगितले. हमासने आणखी काही आठवडे किंवा महिने इस्रायलवर रॉकेटने मारा केला असता तर आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Think Gaza was to be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.