तिसऱ्या मजल्यावर चेनने बांधलेल्या कुत्रीने मारली उडी, शेवट गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2016 03:10 PM2016-04-09T15:10:24+5:302016-04-09T15:10:24+5:30

एका व्यक्तिने जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र्याचं पिल्लू पाळलं आणि आपल्या तिसऱ्या मजल्यावरील घरातील बाल्कनीत साखळीनं बांधून ठेवलं. परंतु या जखडलेल्या जीवनाला कंटाळून

On the third floor, chains made by Chen's body jump, finishing sweet | तिसऱ्या मजल्यावर चेनने बांधलेल्या कुत्रीने मारली उडी, शेवट गोड

तिसऱ्या मजल्यावर चेनने बांधलेल्या कुत्रीने मारली उडी, शेवट गोड

Next
>ऑनलाइन लोकमत
कैरो, दि. 9 - कैरोमध्ये एका व्यक्तिने जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र्याचं पिल्लू पाळलं आणि आपल्या तिसऱ्या मजल्यावरील घरातील बाल्कनीत साखळीनं बांधून ठेवलं. परंतु या जखडलेल्या जीवनाला कंटाळून या लहानग्या कुत्रीनं बाल्कनीबाहेर उडी मारली.
जवळपास पाचतास तशीच लोंबकळलेल्या अवस्थेत ती राहिल्याचा अंदाज आहे, परिणामी तिचा गळ्याला गंभीर इजा झाली. परंतु तिचं हो धाडस अखेर फळाला आलं. खालून जाणाऱ्या एका वाटसरूनं प्राणीमित्रांना ही गोष्ट सांगितली आणि बेला नावाच्या या कुत्रीची सुटका झाली. इजिप्शियन सोसायटी फॉर मर्सी टू अॅनिमल्स या संस्थेमुळे बेलाचे प्राण वाचले तर स्पेशल नीड्स अॅनिमल रेस्क्यू अँड रिहॅबिलेशन किंवा स्नार या संस्थेने बेलाच्या पुनवर्सनासाठी प्रयत्न केले.
 
 
बेलाला सांभाळण्यासाठी अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्समधल्या एका महिलेने तयारी दर्शवली आणि बेलाला नवीन घर मिळालं आता तिला मस्त मैदानात हुंदडता येतं, पाण्यात खेळता येत आणि अन्य कुत्र्यांच्या संगतीत राहता येतं.
 

Web Title: On the third floor, chains made by Chen's body jump, finishing sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.