आता थर्ड वर्ल्ड वॉर अशक्य! रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं 'खास' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:06 AM2021-07-01T00:06:07+5:302021-07-01T00:07:02+5:30

काळ्या समुद्रात गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौकांसोबतच अमेरिकेचे पाळत ठेवणारे विमानही कार्यरत होते, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे.

Third world war not possible because western county know they cannot win says Russian president Vladimir Putin | आता थर्ड वर्ल्ड वॉर अशक्य! रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं 'खास' कारण!

आता थर्ड वर्ल्ड वॉर अशक्य! रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं 'खास' कारण!

Next

काळ्या समुद्रात गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौकांसोबतच अमेरिकेचे पाळत ठेवणारे विमानही कार्यरत होते, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. याच बरोबर, यातील एका युद्धनौकेने चेतावणीच्या स्वरुपात गोळीबारही केला आणि 23 जूनला इंग्लंडच्या या युद्धनौकांना क्रिमियाच्या द्विपकल्पाजवळून सहजतेने बाहेर जाता यावे, यासाठी डिफेंडरच्या मार्गावर विमानांच्या सहाय्याने बॉम्बदेखील टाकले, असे मॉस्कोने म्हटले आहे. मात्र, इंग्लंडने असे काहीही घडले नहा, असे म्हटले आहे. तसेच त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही आणि ते यूक्रेनच्या समुद्री सीमेत होते, असेही इंग्लंडने म्हटले आहे.

यावर, या घटनेमुळे तिसरी जागतीक महायुद्ध होऊ शकते का? असा प्रश्न विचारला असता पुतीन म्हणाले, रशियाने इंग्लंडच्या युद्धनौका बुडवल्या असत्या, तरी याची शक्यता नव्हती. कारण पश्चिमेकडील शक्तींना माहीत आहे, की जागतीक युद्धांत आता ते जिंकू शकत नाहीत.

पुतीन बुधवारी दीर्घ लाइव्ह कॉल-इन शोमध्ये म्हणाले, शक्यतो रशियन सैन्याकडून ब्रिटिश विध्वंसक युद्ध नौकांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे, हेच अमेरिकन विमानांचे मिशन होते. मॉस्कोला अमेरिकेच्या हेतूची कल्पना आहे आणि संवेदनशील आंकड्यांचा खुलासा करण्यापासून वाचण्यासाठी त्याच अनुशंगाने उत्तर देण्यात आले.

इंग्लंडने गेल्या बुधवारी यासंदर्भात बोलताना म्हटले होते, की त्यांच्या युद्धनौका डिफेंडर अंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रवासाच्या मार्गात नियमितपणे कार्यरत होत्या आणि क्रिमियाजवळ यूक्रेनच्या समुद्री सीमेत होत्या. जगातील अधिकांश देशांप्रमाणेच इंग्लंडदेखील क्रिमियाला यूक्रेनचाच भाग मानतो. तर रशियानेने हे द्विपकल्प वेगळे केले होते. 

यावर रशियानेही इशारा देताना म्हटले आहे, की यानंतर त्यांनी रशियन सैन्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, तर घुसखोरी करणाऱ्या युद्धनौकांना निशाना बनविले जाऊ शकते.

Web Title: Third world war not possible because western county know they cannot win says Russian president Vladimir Putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.