'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत मांजर; संपत्ती ऐकून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:12 PM2024-09-03T19:12:50+5:302024-09-03T19:14:54+5:30

world's richest cat nala : मांजर आणि संपत्तीचा तसा भारतात काही संबंध येत नाही. पण, अमेरिकेतील नाला नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे. या मांजरीचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत.

'This' is the richest cat in the world; You will get dizzy hearing wealth | 'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत मांजर; संपत्ती ऐकून चक्रावून जाल

'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत मांजर; संपत्ती ऐकून चक्रावून जाल

World's Richest Cat: आपल्या आजूबाजूला अनेकजण पाळीव प्राणी सांभाळतात. अनेकजण त्यांच्या नावाने सोशल मीडियावर अकाऊंटही सुरू करतात. पाळीव प्राण्याचे असे अनेक अकाऊंट सोशल मीडियावर बघायला मिळतात. इतकेच नाही, तर काही प्राण्याचे सोशल मीडियावर सेलिब्रेटींपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. त्यातून त्यांना सांभाळणाऱ्यांना पैसाही मिळतो. पण, जगातील सर्वात श्रीमंत मांजरीबद्दल तुम्ही कधी ऐकले किंवा वाचले आहे का? तर जगातील सर्वात श्रीमंत मांजरीचे नाव आहे, नाला. 

अमेरिकेतील नाला नावाची संपत्ती ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. या नाला मांजरीची संपत्ती आहे 839 कोटी रुपये. Cats.com च्या माहितीनुसार नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे.

नाला मांजरीच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय?

इतकी श्रीमंत मांजर आहेत, तर तिने इतके पैसे कसे कमावले, असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल? त्याबद्दलही जाणून घेऊयात.

नाला मांजरीचे वास्तव्य अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात आहे.  २०१० मध्ये वरिसिरी मेथचिटिफन यांनी एका प्राणी निवारा केंद्रातून तिला दत्तक घेतले. १०१२ मध्ये त्यांनी नालाच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले. तिचे व्हिडीओ आणि फोटो ते शेअर करू लागले. 

नाला मांजरीचे इन्स्टाग्रामवर 4.5 मिलियन फॉलोअर्स

नाला मांजरीने हळूहळू सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले. तिचे फॉलोअर्स वाढत गेले. गेल्या १२ वर्षात तिच्या फॉलोअर्सची संख्या ४.५ मिलियनवर पोहोचली. 

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी मांजर म्हणून नालाची २०२० मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. तिचा फॉर्ब्सच्या यादीतही २०१७ मध्ये समावेश करण्यात आला होता. 

प्रचंड लोकप्रिय असलेल्या नाला मांजरीच्या नावावर 'लिव्हिंग यूवर बेस्ट लाईफ अकॉर्डिंग नाला कॅट' असे ई-बुक आहे. तिची स्वतःची वेबसाईट आहे. मांजरीच्या खाद्याचा ब्रॅण्ड 'लव नाला' आहे. रिपोर्टनुसार नालाने गुंतवणूकदारांकडून १२ मिलियन डॉलर फंडिंग जमवले आहे. इन्स्टाग्रामबरोबरच नाला मांजरीचे टिक-टॉक आणि युट्यूब वरही अकाऊंट आहेत. 

Web Title: 'This' is the richest cat in the world; You will get dizzy hearing wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.