ही आमच्यासाठी अखेरची संधी होती...; रशियन चंद्रयान क्रॅशचा टॉप सायंटिस्टने घेतला धसका, अॅडमीट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:35 AM2023-08-22T10:35:06+5:302023-08-22T10:35:20+5:30
रशियाचे लुना २५ मिशनही भारताच्या चंद्रयान २ प्रमाणे फेल झाले. लँडरचा थ्रस्टर सुरु न झाल्याने लुना २५ चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले.
एखादी मोहिम अपयशी झाली तर ती किती वेदनादायी असते हे आपण चंद्रयान २ च्या वेळी पाहिले. चंद्रयान २ चे क्रॅश लँडिंगही फेल झाल्यानंतर इस्त्रोचे प्रमुख ढसाढसा रडले होते. तिथे उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धीर दिला होता व पुढील मोहिमेसाठी कामाला लागा असे म्हटले होते. परंतू, रशियामध्ये त्याच्या उलट परिस्थिती आहे.
रशियाचे लुना २५ मिशनही भारताच्या चंद्रयान २ प्रमाणे फेल झाले. लँडरचा थ्रस्टर सुरु न झाल्याने लुना २५ चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन आदळले. याचा धसका रशियाचे टॉपचे शास्त्रज्ञ मिखाइल मारोव यांनी घेतला आहे. ९० वर्षीय शास्त्रज्ञाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
रशियन मीडियानुसार चंद्र मोहिम फेल झाल्याने मारोव यांना धक्का बसला आहे. ही आमच्यासाठी अखेरची संधी होती...; रशियन चंद्रयान क्रॅशचा टॉप सायंटिस्टने घेतला धसका, अॅडमीट झाल्यानंतर मारोव यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली आहे. आता तपास चालू आहे, पण काळजी का नाही करायची, हा आयुष्यभराचा प्रश्न आहे, त्याचे मला दु:ख झाले आहे, असे मारोव म्हणाले आहेत.
आम्ही चंद्रावर योग्यरित्या लँड करू शकलो नाही, याचे वाईट वाटतेय. चंद्र मोहिम पुन्हा सुरु करण्याची ही शेवटची संधी होती, असे मारोव म्हणाले. लुना २५ द्वारे रशियाला सोव्हिएत काळातील लुना कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची आशा होती. रविवारी रशियन अंतराळ एजन्सी रोस्कोस्मोसने लूना-25 मिशन चंद्रावर अपघातग्रस्त झाल्याचे जाहीर केले. लुना २५ अनियंत्रित झाले आणि ते चंद्रावर आदळले होते.