‘त्या’ छायाचित्रांमुळे जगभर दु:ख
By admin | Published: September 3, 2015 10:19 PM2015-09-03T22:19:49+5:302015-09-03T22:19:49+5:30
सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या सर्व प्रश्नाशी संबंधित हृद्य हेलावून टाकणारी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कालच आयलान कुर्दी या तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह
दमास्कस : सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या सर्व प्रश्नाशी संबंधित हृद्य हेलावून टाकणारी छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत. कालच आयलान कुर्दी या तीन वर्षाच्या बालकाचा मृतदेह एजियन समुद्राच्या काठावर सापडल्यामुळे जगभरात दु:ख व्यक्त होत आहे. पाश्चिमात्य देशातील वर्तमानपत्रांनी त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करुन संपुर्ण जगाला आतातरी स्थलांतरावर तोडगा काढा अशी विनंती केली आहे.
आयलान कुर्दी हा तीन वर्षांचा मुलगा सीरियातील कोबानी गावातला होता. सीरियातील यादवीला कंटाळून जीव मुठीत धरुन त्याचे कुटुंब कॅनडाला जाण्यासाठी साध्या बोटीतून निघाले होते. मात्र हा एजियन समुद्रातच बोट उलटून त्याचा मृत्यू झाला. अगदी लहानग्या अशा आयलानचा लाल टी शर्ट व निळ््या चड्डी घातलेला मृतदेह वाहून किनाऱ्याला आला. त्यानंतर त्याची प्रसिद्ध झालेली चित्रे अनेकांचे काळीज पिळवटणारी ठरली. टष्ट्वीटरवर देखिल त्याच्या नावाचा ह्युमॅनिटी वॉश्ड अशोअर (मानवताच वाहून गेली) असा हॅशटॅगही तयार करण्यात आला. ब्रिटीश डेली मेल याचे वर्णन मानवनिर्मित प्रलयाचा लहानगा बळी असे केले तर इटलीच्या ला रिपब्लिकाने टष्ट्वीट करताना, जगाला स्तंभित करणारा एक फोटो असे त्याच्या मृतदेहाच्या छायाचित्राचे वर्णन केले. आयलानबरोबर आणखी १२व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेकडो लोकांनी यामध्ये प्राण गमावले आहेत आयलानच्या या छायाचित्रांमुळे त्याची तीव्रता आणखीच गडद झाली आहे.