इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरासमोर हजारो लोकांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:04 AM2020-09-14T02:04:59+5:302020-09-14T02:05:29+5:30
इस्रायलमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत आहे. यहुदी नववर्षापूर्वी या आठवड्यात येथे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
येरुसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांच्या घरासमोर हजारो लोकांनी शनिवारी निदर्शने केली. कोरोना महामारीच्या उद्रेकाची स्थिती योग्यपणे हाताळली नसल्याचाही त्यांच्यावर आरोप करीत लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
इस्रायलमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत आहे. यहुदी नववर्षापूर्वी या आठवड्यात येथे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी शनिवारी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. नेतन्याहू यांनी निदर्शकांना अराजकतावादी म्हटले आहे. इस्रायलमध्ये कोरोनाचे १,५०,००० रुग्ण आढळले असून, १,१०० पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
मंत्र्याचा राजीनामा
कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या विरोधात प्रमुख मंत्री याकोव लित्जमॅन यांनी राजीनामा दिला. महामारीच्या प्रारंभी आरोग्यमंत्री राहिलेले व सध्या आवासमंत्री असलेले याकोव यांनी लॉकडाऊनच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.