छोटा शकील हस्तकाचे थायलँडमधून प्रत्यार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:31 AM2018-08-09T04:31:17+5:302018-08-09T04:31:21+5:30
अंडरवर्ल्ड डॉव छोटा शकील याचा निकटचा हस्तक सैयद मुझक्कीर मुदस्सर हुसैन ऊर्फ मुन्ना झिंगरा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा आदेश थायलँडमधील फौजदारी न्यायालयाने बुधवारी दिला.
बँकॉक : अंडरवर्ल्ड डॉव छोटा शकील याचा निकटचा हस्तक सैयद मुझक्कीर मुदस्सर हुसैन ऊर्फ मुन्ना झिंगरा याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचा आदेश थायलँडमधील फौजदारी न्यायालयाने बुधवारी दिला.
मुन्ना हा आमचा नागरिक असल्याने त्याला आमच्या ताब्यात द्या, असा अर्ज करून मुन्नाच्या प्रत्यार्पणासाठी भारताने दाखल केलेल्या खटल्यात पाकिस्तानने खोडा घातला होता. मुन्नाची दुसरी पत्नी व तिची मुले पाकिस्तानमध्ये राहतात,हा त्याचा मुख्य आधार होता. त्यासाठी ६५ साक्षीदारांनी साक्षीही दिल्या होत्या. परंतु मुंबई पोलिसांनी मुन्नाच्या गुन्हेगारीसंबंधी तयार केलेले ‘डॉसियर’ मान्य करून न्यायालयाने मुन्ना हा भारताचाच नागरिक असल्याचा निर्वाळा दिला. छोटा राजनच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा झाल्याने मुन्ना सन २००२ पासून बँकॉकच्या तुरुंगात आहे. मुन्ना मुळचा मुंबईतील जोगेश्वरीचा असून त्याचे शिक्षण इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये झाले. त्याची पहिली पत्नी अजूनही जोगेश्वरी येथेच राहते. १९९७ मध्ये एका खटल्यात जामिनावर सुटल्यानंतर तो आधी दुबईला व नंतर तेथून कराचीला पळाला.