संचारबंदी उठवताच न्यूयॉर्कमध्ये हजारो लोकांनी केली शांततापूर्ण निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:13 AM2020-06-09T02:13:22+5:302020-06-09T02:14:40+5:30
महापौर बिल डी. ब्लासिया यांनी रविवारी आंदोलनापूर्वी शहरात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी हटविण्याचे निर्देश दिले
न्यूयॉर्क : एकही अप्रिय घटना न घडल्यामुळे न्यूयॉर्कमधील संचारबंदी घटविण्यात आली. त्यानंतर हजारो लोकांनी शांततापूर्ण निदर्शने केली. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध सुरू असलेल्या या आंदोलनाच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील अवरोधक हटविण्यात आले. आंदोलकांना मॅनहटनमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल व टॉवरपर्यंत पोहोचता यावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. तथापि, यावेळी रात्री संचारंबदी लावण्याचे भय उरले नव्हते.
महापौर बिल डी. ब्लासिया यांनी रविवारी आंदोलनापूर्वी शहरात रात्री ८ वाजेपासून संचारबंदी हटविण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वी शनिवारी रात्री कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नव्हती, दुकानांत तोडफोडसुद्धा करण्यात आली नव्हती. मात्र, त्या आधीच्या रात्री मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. डी. ब्लासिया यांनी रविवारी सकाळी म्हटले होते की, ज्या कोणी शांततापूर्ण पद्धतीने आपले विचार व्यक्त केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो की, न्यूयॉर्क सिटीमध्ये संचारबंदी लावण्याची ही अखेरची वेळ असावी, असे वाटते.
रविवारीही शहरात शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यात आली. त्यात आंदोलकांनी मॅनहटनमध्ये मार्च काढला व घोषणा दिल्या. संचारबंदी हटविण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांनी आंदोलकांना कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहन केले.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँर्ड्यूक्योमो यांनी रॅली व मार्चमध्ये सहभागी लोकांना मास्क घालण्याचे, तसेच कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहन केले. यासाठी १५ तपासणी केंद्रे उघडण्यात येतील व त्यांचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील, असेही ते म्हणाले.
न्यूयॉर्कमध्ये दशकभरात प्रथमच संचारबंदी
च्न्यूयॉर्कमध्ये मागील अनेक दशकांत प्रथमच संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून बंद असलेले शहर खुले करतानाच संचारबंदीही हटविण्यात यावी, असे अधिकाऱ्यांचे नियोजन होते.
जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू
च्ह्युस्टन : श्वेतवर्णीय पोलीस अधिकाºयाच्या हातून मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीय आफ्रिकी-अमेरिकी जॉर्ज फ्लॉयडवर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याचे मित्र व नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली आहे.
च्ह्युस्टननिवासी फ्लॉयडचा २५ मे रोजी मिनियापोलीसमध्ये एका पोलीस अधिकाºयाने त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरल्यानंतर मृत्यू झाला होता.
च् अंत्यसंस्कारानंतर एक श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये माजी उपराष्टÑाध्यक्ष जो बाईडेन यांच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ संदेश दाखवला जाणार आहे. ते व्यक्तिगतरीत्या यावेळी हजर राहणार नाहीत.