बंडखोरांच्या हल्ल्यामुळे इराकचे स्थैर्य धोक्यात
By admin | Published: June 13, 2014 09:51 PM2014-06-13T21:51:27+5:302014-06-13T21:51:27+5:30
बंडखोरांच्या हल्ल्यामुळे
Next
ब डखोरांच्या हल्ल्यामुळेइराकचे स्थैर्य धोक्यातबगदाद : इराकमध्ये सुन्नी बंडखोरांनी मोसूल शहरासह देशातील सुन्नीबहुल भागावर कब्जा करण्यासह राजधानी बगदादकडे आगेकूच सुरू केल्यामुळे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या सरकारसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे बंडखोर वेगाने पुढे सरकत असताना सरकारला आतापर्यंत प्रत्युत्तरादाखल एकही ठोस कारवाई करता येऊ शकलेली नाही. २०११ मध्ये अमेरिकी सैन्य परतल्यानंतर इराकच्या स्थैर्याला निर्माण झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका मानला जात आहे. यामुळे इराकची सुन्नी, शिया आणि कुर्द अशी फाळणी होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांटच्या बंडखोरांनी गुरुवारी इराकची राजधानी बगदादकडे कूच केले. सद्दाम हुसैन राजवटीचे अनेक समर्थक आणि इतर सुन्नी असंतुष्टही त्यांना येऊन मिळाले आहेत. बंडखोरांनी इराकमधील दुसरे मोठे शहर मोसूलवर कब्जा केल्यानंतर तेथे शरिया कायदा लागू करण्याची घोषणाही केली. त्यांनी मंगळवारी मोसूलवर ताबा मिळवून इतर परिसराचीही नाकाबंदी केली होती. सत्तेतील पोकळीचा लाभ उठवत उत्तर इराकमधील कुर्द सुरक्षा दलांनी किरकुक शहरातील हवाईतळ व इराकी लष्कराने सोडून दिलेल्या चौक्यांवर अंमल प्रस्थापित करणे सुरू केले आहे. बगदादच्या उत्तरेकडील सुन्नीबहुल क्षेत्रातील विमानतळावरून तीन विमानांद्वारे अमेरिकी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जर्मनीने आपल्या नागरिकांना त्वरेने इराक सोडण्यास सांगितले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, इराकला त्यांच्या देशाकडून आणखी मदतीची आवश्यकता आहे; मात्र आपण इराकची कशाप्रकारे मदत करू इच्छितो हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अमेरिका इराकमध्ये ड्रोन मोहीम चालविण्यावर विचार करत असल्याचे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकार्याने सांगितले. दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या संकटावर बैठक घेतली. तिकडे अल मलिकी यांनी संसदेला देशात आणीबाणी लागू करण्यास सांगितले. आणीबाणीमुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देश चालविण्यासाठी अतिरिक्त अधिकार प्राप्त होतील.