धमक्या अन् मंदिरांतही तोडफोट! ट्रुडोंच्या राज्यात हिंदूंसाठी 'नरक' बनलाय कॅनडा, गुप्तचर संस्था सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 03:22 PM2023-10-01T15:22:37+5:302023-10-01T15:22:50+5:30
खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत...
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या धोरणामुळे येथील हिंदूंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रुडो सरकार उघडपणे खलिस्तानवाद्यांचे समर्थन करते. तर, खालिस्तानी दहशतवादी येथील हिंदूंना धमक्या देत आहेत. हे दहशतवादी हिंदू मंदिरांवर हल्ले करून तेथे तोडफोडही करत आहेत. एवढेच नाही तर, निज्जरच्या हत्येनंतर, भारत आणि कॅनडा यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच येथील खालिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंना देश सोडण्याचीही धमकी दिली आहे. मात्र, अशा प्रकारच्या धमक्या, द्वेष भावना पसरवणाऱ्या आहेत, असे कॅनाडा सरकारने म्हटले आहे.
भारतीय गुप्तचर संस्थाही सतर्क -
कॅनडात राहणाऱ्या भारतीयांच्या हितासासाठी भारतीय गुप्तचर संस्थाही सतर्क आहेत. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत कॅनडातील वाढती कट्टरता आणि हिंदू समुदायासाठी उभ्या राहणाऱ्या आव्हानांसंदर्भात चर्चा करण्यात आली. गेल्या 5-6 वर्षांत कॅनडातील बदललेल्या परिस्थितीसंदर्भात बोलायचे झाल्यास, 2016 ते 2021 दरम्यान कनाडामध्ये स्थाईक झालेल्या लोकांमध्ये 18 टक्के लोक भारतीय आहेत. तर कॅनाडाच्या एकूण लोकसंख्येत 2.1 टक्के शिख आणि 2.3 टक्के हिंदू आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात भारतावर तथ्यहीन आरोप केल्याने, कॅनडामध्ये या दोन्ही समुदायांमधील तणाव वाढला आहे. मात्र जस्टिन ट्रुडो यांच्या या आरोपांकडे राजकीय फायद्यासंठी उचललेले एक पावूल म्हणून बघितले जात आहे.
हिंदू आणि शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न -
शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या गुरपतवंत सिंह पन्नूनने कॅनाडात राहणाऱ्या हिंदूंना भारतात परतण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावरही व्हिडिओ पोस्ट केला होता. भारतीय वंशाचे हिंदू कॅनडाच्या राज्यघटनेचा सन्मान करत नाहीत, असे त्याचे म्हणणे होते. यानंतर, ट्रुडो यांच्याच पक्षातील खासदार चंद्रा आर्या यांनी म्हटले आहे की, कॅनडामध्ये राहणारे बहुसंख्य हुंदू घाबरलेले आहेत. तसेच, खालिस्तानी दहशतवादी हिंदू-कॅनडीयन आणि शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.