फिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाजं बुडाली, 31 जणांचा मृत्यू, 62 लोकांचे बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:22 AM2019-08-05T09:22:24+5:302019-08-05T09:24:41+5:30

फिलिपिन्समध्ये समुद्रानं धारण केलेलं रौद्ररूप आणि अजस्त्र लाटांनी तीन जहाजं बुडाली आहेत.

three boats drowned in philippines 31 dead 62 lives saved | फिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाजं बुडाली, 31 जणांचा मृत्यू, 62 लोकांचे बचावले प्राण

फिलिपिन्सच्या समुद्रात तीन जहाजं बुडाली, 31 जणांचा मृत्यू, 62 लोकांचे बचावले प्राण

Next

मनिलाः फिलिपिन्समध्ये समुद्रानं धारण केलेलं रौद्ररूप आणि अजस्त्र लाटांनी तीन जहाजं बुडाली आहेत. या दुर्घटनेत तिन्ही जहाजांवरच्या जवळपास 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण बेपत्ता आहे. कोस्ट गार्डचे प्रवक्ते अरमंड बालिलो यांच्या मते या जहाजांमध्ये जास्त करून गुइमारस आणि इलोइलो प्रांतातील लोक होते. हवामानाची स्थिती चांगली नसल्यानं ही जहाजं बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

62 प्रवासी आणि क्रू मेंबर्सला सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. बुडत्या तिसऱ्या जहाजात कोणताही प्रवासी नव्हता. त्यात असलेल्या पाच क्रू मेंबर्सला बचावण्यात आलं आहे. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोराचे वारे वाहू लागले. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला अन् जहाज हेलकावे खाऊ लागले. त्यानंतर एक मोठी लाट आली आणि जहाजचं उलटले, असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. 

तर दोन जहाजांची दुर्घटना झाल्यानंतरही तिसऱ्या जहाजाला पाण्यात उतरण्याची कशी काय परवानगी मिळाली, याबाबत अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हवामान खराब असल्यावर जहाजांना समुद्रात उतरण्याची परवानगी देण्यात येत नाही. हवामान खात्यानं सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचीही माहिती दिली होती. 

Web Title: three boats drowned in philippines 31 dead 62 lives saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.