तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांना फिजिक्समधील नोबेल

By admin | Published: October 5, 2016 04:56 AM2016-10-05T04:56:51+5:302016-10-05T04:56:51+5:30

ब्रिटिश शास्त्रज्ञ डेव्हिड थौलेस, डंकन हॅल्डेन आणि मायकल कोस्टर्लित्झ हे यंदाच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Three British scientists Nobel in Physics | तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांना फिजिक्समधील नोबेल

तीन ब्रिटिश शास्त्रज्ञांना फिजिक्समधील नोबेल

Next

स्टॉकहोम : ब्रिटिश शास्त्रज्ञ डेव्हिड थौलेस, डंकन हॅल्डेन आणि मायकल कोस्टर्लित्झ हे यंदाच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पदार्थाची नवीन स्थिती-अवस्था या शास्त्रज्ञांनी शोधली असून, त्यांचे संशोधन भविष्यातील तंत्रशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या तीनही शास्त्रज्ञांना एकूण ९,३१,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस मिळणार असून, यापैकी थौलेस यांना पुरस्काराच्या रकमेपैकी निम्मी, तर हॅल्डेन आणि कोस्टर्लित्झ यांना निम्मी-निम्मी रक्कम मिळेल. या तीन शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे अनोखे विश्व उमजण्याचा दरवाजा खुला झाला आहे, असे नोेबेल पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे. हे तीनही शास्त्रज्ञ संस्थितीविज्ञानातील (टोपोलॉजी) तज्ज्ञ असून, टोपोलॉजी गणिताचीच एक शाखा आहे. यात पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो.

Web Title: Three British scientists Nobel in Physics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.