तासाभरात इटलीत तीन भूकंपाचे धक्के

By admin | Published: January 18, 2017 06:45 PM2017-01-18T18:45:53+5:302017-01-18T18:45:53+5:30

तासाभरात झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांनी सेन्ट्रल इटली हादरली. सेन्ट्रल इटलीतील तीन भागांमध्ये जवळपास 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे धक्के बुधवारी जाणवले.

Three earthquake hits in Italy | तासाभरात इटलीत तीन भूकंपाचे धक्के

तासाभरात इटलीत तीन भूकंपाचे धक्के

Next
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. 18 - तासाभरात झालेल्या तीन भूकंपाच्या धक्क्यांनी सेन्ट्रल इटली हादरली. सेन्ट्रल इटलीतील जवळपास 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे तीन भूकंपाचे धक्के बुधवारी जाणवले. 
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणने दिलेल्या माहितीनुसार, इटलीच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अमॅट्रिसमध्ये येथील स्थानिक वेळेनुसार साडेदहाच्या सुमारास पहिला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. तर दुसरा भूकंपाचा धक्का 50 मिनिटानंतर बसला. हा 5.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. त्यानंतर तिसरा 10 मिनिटानंतर 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याचे सांगण्यात आले. 
या भूकंपानंतर खबरदारी म्हणून रोममधील सर्व सबवे बंद करण्यात आले. दरम्यान, या भूकंपामुळे झालेल्या जीवित व वित्त हानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. गेल्यावर्षी सुद्धा इटलीत मोठा भूकंप झाला होता. 

 

Web Title: Three earthquake hits in Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.