तीन भारतीय-अमेरिकींची ट्रम्प प्रशासनात नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:43 AM2017-08-05T00:43:30+5:302017-08-05T06:51:12+5:30
अमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला. यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धीक संपदेवर आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकन सरकारच्या तीन महत्वाच्या जागांवर तीन भारतीय-अमेरिकनांना नियुक्त करण्याचा सिनेटने एकमुखाने निर्णय घेतला. यातील एक नियुक्ती ही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील बौद्धीक संपदेवर आहे.
ट्रम्प प्रशासनात नील चॅटर्जी हे फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे सदस्य बनले असून विशाल अमीन हे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एन्फोरसमेंट कोआॅर्डिनेटर झाले आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात बौद्धीक संपदेवरून तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. कृष्णा अर्स यांना पेरुच्या राजदुताची जबाबदारी दिली गेली आहे. अर्स हे १९८६ पासून विदेश सेवेत अधिकारी असून निक्की हॅलेनंतर ते राजदूतपदाची संधी मिळालेले दुसरे भारतीय-अमेरिकन ठरले आहेत. हॅले या साऊथ कॅरोलिनामध्ये दोन वेळा गव्हर्नर होत्या व सध्या त्या संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेच्या राजदूत आहेत.