लंडनमध्ये रेल्वेस्टेशनवर चाकूहल्ल्यात ३ जखमी
By admin | Published: December 6, 2015 10:50 PM2015-12-06T22:50:01+5:302015-12-06T22:50:01+5:30
येथील भूमिगत रेल्वेस्टेशनवर एकाने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन जण जखमी झाले. हल्लेखोराला ताब्यात घ्यायच्या आधी तो ‘हे सिरियासाठी आहे’, असे ओरडत होता.
लंडन : येथील भूमिगत रेल्वेस्टेशनवर एकाने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन जण जखमी झाले. हल्लेखोराला ताब्यात घ्यायच्या आधी तो ‘हे सिरियासाठी आहे’, असे ओरडत होता. हा हल्ला दहशतवादी असल्याचे स्कॉटलंड यार्डचे पोलीस समजत आहेत.
शनिवारी सायंकाळी लायटनस्टोन स्टेशनवर लोकांवर हल्ला झाल्याचे समजताच पोलीस तेथे पोहोचले. ५६ वर्षे वयाचा एक जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाला; परंतु त्याच्या जीवाला धोका नाही. इतर दोघांना किरकोळ जखमा झाल्या. पोलीस या घटनेचा तपास दहशतवादी घटना समजून करीत आहेत. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांनी हल्लेखोर त्याचे हे कृत्य सिरियाशी संबंधित असल्याचे पुन: पुन्हा ओरडत होता, असे सांगितले. हल्लेखोराला टासारने (करंट देऊन शांत करणे) ताब्यात घेण्यात आले. टासर घेऊन येईपर्यंत पोलिसांना आठ मिनिटे लागली. सशस्त्र वाहनही घटनास्थळी पाठविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)