इंग्लंडमधल्या बड्या ग्राहकाची माहिती चोरणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक
By admin | Published: January 29, 2016 05:06 PM2016-01-29T17:06:15+5:302016-01-29T17:39:30+5:30
इंग्लंडच्या टॉक टॉक या ग्राहक कंपनीच्या माहिती चोरून तिचा दुरुपयोग करणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता दि, २९ - इंग्लंडच्या टॉक टॉक या ग्राहक कंपनीच्या माहिती चोरून तिचा दुरुपयोग करणा-या विप्रोच्या तीन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे विप्रो या बड्या आयटी कंपनीच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता आहे.
टॉक टॉक ही ब्रॉडबँडच्या क्षेत्रातली इंग्लंडमधली बडी कंपनी आहे. टॉकटॉक या कंपनीवर ऑक्टोबरमध्ये सायबरहल्ला झाला होता, ज्यामध्ये जवळपास दीड लाख ग्राहकांची माहिती भलत्याच व्यक्तिंच्या हातात जाण्याचा धोका निर्माण झाला होता.
या हल्ल्याचा जेव्हा तपास करण्यात आला, त्यावेळी टॉकटॉकच्या अधिका-यांना विप्रोच्या कर्मचा-यांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्याचा छडा लागला. त्यांनी बीएई सिस्टिम या कंपनीला सायबरहल्ल्याचा छडा लावण्याचं काम दिलं. यामध्ये कोलकातास्थित विप्रोचे कर्मचारी दोषी असल्याचं आढळलं.
कोलकाता पोलीसांनी टॉकटॉकने दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांना अटक केली आहे.
कोलकाता येथे विप्रोचे सुमारे एक हजार कर्मचारी असून ते टॉकटॉकला तांत्रिक सहाय्य करतात, त्याखेरीज विप्रो बीपीओदेखील टॉकटॉकशी संलग्न आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टॉकटॉक व विप्रो यांच्यातील सहा वर्षांचा करार सुमारे ७० दशलक्ष पौंड इतक्या किमतीचा असू शकतो.