' या' तीन शास्त्रज्ञांना मिळाला यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 08:00 PM2017-10-02T20:00:48+5:302017-10-03T02:53:58+5:30
वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे.
स्टॉकहोम - वैद्यकशास्त्रासाठीचा यंदाचा प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार जेफरी सी. हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल डब्लू. यंग या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. ‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ या महत्वपूर्ण संशोधनासाठी या तिघांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
जेफरी हॉल, मायकल रोसबाश आणि मायकल यंग यांना वैद्यकशास्त्रातील 108 व्या नोबेल पुरस्काराची कारोलिन्स्का इन्सिट्यूटमधील नोबेल समितीच्या व्यासपीठावरून सोमवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांतर्गत या शास्त्रज्ञांचे नाव असलेले नोबेलचे मानचिन्ह तसेच ८ लाख २५ हजार पौंडांची रक्कम या तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात येणार आहे.
Our biological clock helps to regulate sleep patterns, feeding behavior, hormone release and blood pressure #NobelPrizepic.twitter.com/NgL7761AFE
— The Nobel Prize (@NobelPrize) October 2, 2017
‘सजीवांमधील दैनंदिन प्रक्रियांचे अंतर्गत चक्र’ यामध्ये या तिघांनी महत्वपूर्ण संशोधन केले आहे. या घड्याळरुपी चक्रामुळे सजीवांमधील झोपेचे प्रकार, खाण्यापिण्याच्या पद्धती, हार्मोन्सची निर्मिती आणि रक्तदाब यांचे नियमन होते, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. सजीवांमधील हे अंतर्गत घड्याळ आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये बदल झाल्यास त्याचा सजीवांवर परिणाम होतो. यासाठी उदाहरणादाखल त्यांनी एखादे जेट विमान जोराचा आवाज करीत आपल्या डोक्यावरुन गेल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचा दाखला दिला आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या टीमने सजीवांमधील या अंतर्गत घडाळ्यातील विविध प्रकारचे जनुकं आणि प्रथिनांचा शोध लावला आहे.
हॉल हे सध्या निवृत्त झाले असले तरी ते अजूनही आपला बराच वेळ वालथम येथील ब्रँडिज विद्यापीठातील संशोधनासाठी देतात. तर रोसबाश हे देखील ब्रँडिज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर, यंग हे न्युयॉर्क येथील रॉकेफेलर विद्यापीठात संशोधनाचे काम करीत आहेत.
BREAKING NEWS The 2017 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Jeffrey C. Hall, Michael Rosbash and Michael W. Young. pic.twitter.com/lbwrastcDN
— The Nobel Prize (@NobelPrize) October 2, 2017
आता भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा मंगळवारी करण्यात येणार आहे. तसेच, येत्या बुधवारी रसायनशास्त्रातील, शुक्रवारी शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर अर्थशास्त्रातील नोबेल पुढील सोमवारी घोषित करण्यात येणार आहे.
या संशोधनाचे महत्त्व; ‘जैविक घड्याळ’चे कार्य नेमके चालते कसे?
पूर्वी मराठीच्या शालेय पाठ्यपुस्तकात ‘आजीचे घड्याळ’ ही कविता असायची. गजर लावण्यासाठी कोणतेही घड्याळ नसलेली आजी दररोज पहाटे ठरल्या वेळी न चुकता कशी उठते, याविषयी नातवंडांना वाटणाºया अचंब्याचा उलगडा कवीने या कवितेतून केला होता. ‘आजीच्या जवळील घड्याळ कसे आहे चमत्कारिक’ अशी सुरुवात करून आजी घड्याळ नसूनही घड्याळ््याच्या काट्याप्रमाणे अचूकपणे दिनचर्या कशी पार पाडते, याचे वर्णन त्या कवितेत होते. सोप्या भाषेत सांगायचे, तर हॉल, रॉसबॅच आणि यंग या तीन वैज्ञानिकांनी ‘आजीच्या घड्याळा’चे हे कोडे वैज्ञानिक परिभाषेत उलगडून दाखविले आहे. त्यांनी हे संशोधन फळे खाणाºया माश्यांवर प्रामुख्याने केले असले, तरी त्यांचे निष्कर्ष तमाम सजीवसृष्टीस तंतोतंत लागू पडणारे आहेत.
पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या जीवनचक्राची गती पृथ्वीच्या परिवलन गतीशी समरूप असते व सजीवांच्या शरीरातील जैविक क्रिया या दिनमानानुसार होत असतात. मानवासह सर्वच सजीवांच्या शरिरात एक ‘जैविक घड्याळ’ असते त्यामुळे ते दिवसाच्या कलांनुसार आपल्या शारीरिक क्रियांमध्ये अनुरूप बदल करीत असतात, याची कल्पना फार पूर्वीपासून होती, परंतु शरिरातील या ‘जैविक घड्याळ’चे कार्य नेमके चालते कसे? याचे उत्तर या तिघांनी शोधले आणि ठरावीक प्रकारच्या प्रोटिन्सच्या चढउतारामुळे हे शक्य होते, असा त्यांनी निष्कर्ष काढला. शरीरातील ‘जैविक घड्याळा’च्या या गतीला ‘सिरकॅडिन ºिहदम’ असे म्हटले जाते. ‘सिरकॅडियन’ हा शब्द ‘सिरका’ व ‘डिएस’ या दोन लॅटिन शब्दांच्या संयोगाने तयार झालेला आहे. ‘सिरका’ म्हणजे ‘सभोवताल’ आणि ‘डिएस’ म्हणजे दिवस.