एका इलेक्ट्रिक कारमुळे तीन हजार कार जळून खाक; भारतीयाचा मृत्यू, २० जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 08:53 AM2023-07-28T08:53:02+5:302023-07-28T08:56:17+5:30

नेदरलँड्सच्या किनाऱ्याजवळील उत्तर समुद्रात सुमारे ३,००० कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग लागली.

Three thousand cars burned because of one electric car; Indian killed, 20 injured | एका इलेक्ट्रिक कारमुळे तीन हजार कार जळून खाक; भारतीयाचा मृत्यू, २० जण जखमी

एका इलेक्ट्रिक कारमुळे तीन हजार कार जळून खाक; भारतीयाचा मृत्यू, २० जण जखमी

googlenewsNext

लंडन : नेदरलँड्सच्या किनाऱ्याजवळील उत्तर समुद्रात सुमारे ३,००० कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला आग लागली. यात एका भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. जहाजात २५ इलेक्ट्रिक कार हाेत्या. त्यापैकी एका कारला आग लागल्यामुळे इतर गाड्या पेटल्याची शक्यता आहे. 

‘फर्मन्टाईल हायवे’ असे या जहाजाचे नााव आहे. ते जर्मनीवरून इजिप्तला जात होते. मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सदस्याची ओळख पटलेली नाही. बचावलेल्या सदस्यांना हेलिकाॅप्टरद्वारे वाचविण्यात आले. 

३ हजार कारची वाहतूक करणाऱ्या ‘फर्मन्टाईल हायवे’ या जहाजाला आग लागली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आग लागल्यानंतर ७ जणांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. 

...तर जहाज बुडण्याची शक्यता

२३ क्रू मेंबर्सना जहाजातून बाहेर काढण्यासाठी बचाव नौका व हेलिकॉप्टरचा वापर केला. 

२५ इलेक्ट्रिक कारपैकी एका कारला आग लागल्यामुळे भडकली असावी, अशी शक्यता आहे.

१६ तासांपासून सुरू आग विझवण्याचे प्रयत्न आहेत. त्यामध्ये अजूनही यश आलेले नाही. 

आग विझवण्यासाठी जर जहाजामध्ये पाणी भरले तर ते अस्थिर होऊन बुडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Three thousand cars burned because of one electric car; Indian killed, 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.