तिबेटमध्ये दुसरे हवाई टर्मिनल सुरू

By admin | Published: March 7, 2017 04:07 AM2017-03-07T04:07:40+5:302017-03-07T04:07:40+5:30

चीनने तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या विमानतळ टर्मिनलचा सोमवारी वापर सुरू केला

Tibet launches second air terminal | तिबेटमध्ये दुसरे हवाई टर्मिनल सुरू

तिबेटमध्ये दुसरे हवाई टर्मिनल सुरू

Next


बीजिंग : चीनने तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या विमानतळ टर्मिनलचा सोमवारी वापर सुरू केला. भारताच्या सीमेजवळ असलेल्या या टर्मिनलची २०२० साली वार्षिक क्षमता ७५०००० प्रवाशांना व तीन हजार टन माल वाहतूक हाताळण्याची असेल. हे नवे विमानतळ टर्मिनल तिबेटमधील सहावे असून, ते अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची मैनलिंग विमानतळाचा भाग आहे.
तिबेटमध्ये चीन रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवत असल्यामुळे भारतात त्याबद्दल चिंता व्यक्त झाली आहे. या पायाभूत सुविधांचा मोठा लाभ चीनच्या लष्कराला होत आहे. गेल्या काही वर्षांत भारतानेही सीमेवरील भागात विकासाची कामे हाती घेतली आहेत. विमानतळाने १०,३०० चौरस मीटर जागा व्यापली असल्याचे सोमवारी चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने म्हटले. (वृत्तसंस्था)

Web Title: Tibet launches second air terminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.