बाळाला वाघ दाखवता दाखवता पिंजऱ्याच्या जवळ पोहोचली आई, आता आयुष्यभर होईल पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:33 AM2021-09-28T11:33:56+5:302021-09-28T11:38:14+5:30
अनास्तासिया म्हणाली की, ती इतर लोकांप्रमाणे पिंजऱ्यापासून ३० सेमी अंतरावर होती. तिला नाही माहीत की, वाघाने कधी आणि कसा हल्ला केला.
आपल्या मुलाला वाघ दाखवण्यासाठी प्राणी संग्रहालयात गेलेल्या महिलेने अशी काही चूक केली की ज्याची शिक्षा तिच्या बाळाला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. महिला वाघच्या पिंजऱ्याच्या फारच जवळ गेली होती. तेव्हा अचानक वाघाने हल्ला केला आणि लहान मुलाचा हाताचा अंगठा त्याने तोडला. ही घटना रशियातील 'द तायगन' सफारी पार्कमध्ये घडली.
बाळ रडलं म्हणून समजलं
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, २२ वर्षीय अनास्तासिया आपला मुलगा लिओला घेऊन सफारी पार्कमध्ये गेली होती. बाळाला वाघ दाखवता दाखवता तिला हे समजलंच नाही की, पिंजऱ्याच्या किती जवळ पोहोचली. तेव्हाच वाघाने अचानक हल्ला केला आणि पिंजऱ्याच्या ग्रिलमधून पंजा बाहेर काढून बाळाचा अंगठा खाल्ला. बाळाच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा अनास्तासियाला या घटनेबाबत समजलं.
पार्ककडून खुलासा
अनास्तासिया म्हणाली की, ती इतर लोकांप्रमाणे पिंजऱ्यापासून ३० सेमी अंतरावर होती. तिला नाही माहीत की, वाघाने कधी आणि कसा हल्ला केला. तेच इतर लोक म्हणाले की, मुलाला पिंजऱ्याच्या जवळ पाहून वाघ अचानक उडी घेऊन समोर आला आणि त्याने हल्ला केला. पार्क प्रशासनाने सांगितलं की, महिला निश्चितपणे पिंजऱ्याच्या खूप जवळ पोहोचली असेल. ज्यामुळे ही घटना घडली असावी.
कायदेशीर कारवाई करणार आई
अनास्तासिया म्हणाली की, ती सुरक्षेच्या कमतरतेमुळे पार्कवर केस करणार आहे. ती पिंजऱ्याच्या जास्त जवळ न गेल्याचंही म्हणाली. ती म्हणाली की, 'मी ठराविक अंतरावर होती. त्यामुळे ही घटना पार्कमधील सुरक्षा कमी असल्याने घडली'. अनास्तासियानुसार, तिला वाघाच्या डरकाळीचा आवाज आला नाही. ज्यामुळे तिला हल्ल्याचा काहीच अंदाज आला नाही. वाघ बाळाचा अंगठा तोंडाने तोडून तेथून निघून गेला.